Viral Video : दिल्ली मेट्रो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ नेहमी चर्चेचा विषय असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी इथे कोणी भांडण करताना दिसतो तर कधी कपल किस करताना दिसते.
सध्या मेट्रोतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हाणामारी करताना दिसत आहे. त्यांची मारहाण एवढी वाढली की त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये तरुणांचा राडा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. त्याने अंगावर शर्ट घातलेला नाही आणि समोर असलेल्या तरुणाशी वाद घालताना दिसतो. समोर असलेल्या तरुणाचा सुद्धा शर्ट फाटलेला दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शर्ट न घातलेला तरुण वाद घालताना दिसत आहे आणि समोरच्या तरुणाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो तेव्हा मेट्रोतील काही प्रवासी त्याला थांबवतात. त्याला वाद घालू नको, म्हणून समजवतात. तो जोरजोराने म्हणताना दिसतो, “कम ऑन कम ऑन लेट्स फाइट” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)
Rishi Choudhary या एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “‘कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट’ दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत. दोन प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि धावत्या मेट्रोमध्ये हाणामारी केली”
यापूर्वी दिल्ली मेट्रोतील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मेट्रोत सीटसाठी प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले होते. बॅकपॅक आणि इअरफोन घेऊन बसलेल्या एका माणसाचे महिलांच्या गटाशी जोरदार वाद झालेला दिसून आला. गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये एका महिला प्रवाशाने या माणसाला सीटवरून उठण्याची विनंती केली.
वारंवार विनंती करूनही, तो प्रवाशी त्याच्या सीटवर बसून राहण्याच्या निर्णयावर ठाम राहतो. महिला त्याला म्हणताना ऐकू येतं का, तू तरी मोठ्या मनाचा माणूस हो” पण काही क्षणांनंतर, तो शेवटी उभा राहतो. त्याने हार मानली म्हणून नाही, तर त्याला पुढच्या स्टॉपवर उतरायचं असतं म्हणून तो उभा राहतो.