लहान मुलांच्या कार्टून्समध्ये अनेकदा आपल्याला घरातली सगळी कामं करणारा अत्यंत हुशार असा रोबोट म्हणजेच यंत्रमानव पाहायला मिळतो. तसेच रोबोट्स लवकरच प्रत्येकाच्या घरात असतील असे अंदाज काही वर्षांपूर्वी लोकांनी केले होते, जे आता खरेदेखील होत आहेत. तुम्ही स्वतःच्या घरात पाहिले तर अशी अनेक उपकरणे आहेत, जी तुमच्याशी संवाद साधतात, तुमच्या आज्ञांचे पालन करतात.

आपण याच तंत्रज्ञानाचा वापर करून फोनवरून अन्नपदार्थ ऑर्डर करत असतो. मात्र, तुम्ही कधी फूड डिलिव्हरी करणारा रोबोट पाहिला आहे का? तुमची ऑर्डर तुमच्या दारापर्यंत पोहोचवणारे रोबोट्स खरंच अस्तित्वात आहेत. असे रोबोट्स चीनमध्ये काम करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून समजते.

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे

हेही वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या फुलाला येतो ‘सडक्या मांसाचा’ वास! काय आहे याचे नाव, जाणून घ्या

इन्स्टाग्रामवरून ken_abroad नावाच्या अकाउंटने या भन्नाट रोबोटचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता हा रोबो नेमके काम कसे करतो ते पाहू. या व्हिडीओमध्ये केनने [व्हिडीओ शेअर करणारी व्यक्ती] दाखवल्यानुसार, फूड डिलिव्हरी करणारा रोबोट ऑर्डर घेऊन खोलीपाशी आल्यानंतर तो केनला फोन करतो. त्याबरोबर केन आपल्या खोलीचे दार उघडतो.

दारासमोर एक छोटा काळ्या-पांढऱ्या रंगाचा रोबोट उभा असल्याचे आपल्याला दिसते. त्या रोबोटच्या डोक्यावर एक लहानशी स्क्रीन दिसते; त्यावर ‘ओपन’ [उघडा] असा एक पर्याय असल्याचे केन सांगतो. त्यावर क्लिक केल्यानंतर, त्या रोबोटमध्ये बसवलेली काळ्या रंगाची काच उघडते आणि त्यामध्ये आपल्याला जेवणाचे पार्सल दिसते. केनने ते पार्सल घेतल्यानंतर तो रोबोट चायनीजमध्ये काहीतरी बोलतो. मात्र, नेमके काय ते केनलादेखील कळत नाही. पण, रोबोटला तिथून पाठवण्यासाठी पुन्हा त्या स्क्रीनवरील ‘क्लोज’ बंद करा, या पर्यायावर क्लिक करतो. तेव्हा तुमचे पार्सल घेण्यासाठी ठराविक सेकंद असतात असेही केन सांगतो. क्लोज पर्यायावर क्लिक केल्यानंतर तो रोबोट पुन्हा चायनीजमध्ये काहीतरी बोलून निघून जातो, असे या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसते.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहा.

“जेवणसुद्धा रोबोट्सने बनवले असेल का?” असा एकाने प्रश्न केला आहे. “खूपच सोयीचे आहे हे” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “हा रोबोट वर-खाली जाण्यासाठी लिफ्टचा वापर कसा करत असेल?” असा तिसऱ्याला प्रश्न पडला आहे. “आपले आयुष्य २०५० मध्ये कसे असेल याची झलक वाटते आहे. चीन खरंच खूप प्रगत आहे, पण केनसारख्या लोकांनी ते दाखवले नाही तर आपल्याला समजणार नाही, थँक्स केन” असे चौथ्याने लिहिले आहे.

हेही वाचा : बाईकवर बसलेल्या या काकूंचे साडीप्रेम बघून तुम्हीही खळखळून हसाल! पाहा हा मजेशीर Video

@ken_abroad या इन्स्टाग्राम अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ३६४K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.