या पृथीवर, निसर्गात अनेक प्रकारचे आणि प्रजातींचे सजीव वास करतात. यात सूक्ष्म जीवापासून ते अवाढव्य प्राणी आणि लहानशा रोपापासून ते महाकाय वृक्षांचा समावेश आहे. त्याच निसर्गात अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. अगदी सोपे उदाहरण म्हणजे आपला खोल अथांग समुद्र, अवकाशात दिसणारे असंख्य तारे. मानव अंतराळापासून ते समुद्राच्या खोलात काय दडले आहे याचा सतत शोध घेत असतो; त्यावर अभ्यास करीत असतो. तसेच पृथ्वीवर असलेल्या सुंदर आणि नाजूक अशा पाना-फुलांचासुद्धा आपण शोध घेत असतो, त्यावर अभ्यास करत असतो.

आज आपण अशाच एका अनोख्या आणि विचित्र फुलाबद्दल माहिती घेणार आहोत. हे फूल आपल्या जाई, जुई, चाफा, गुलाब यांसारखे मुळीच नाहीये. हे एक अतिशय खास फूल आहे. कारण ते जगातील सर्वात मोठे असे फूल आहे, याचे नाव रॅफ्लेसिया [Rafflesia] असे आहे. नेमकी या फुलाची काय खासियत आहे, हे कुठे उगवते, त्याचा आकार किती आहे हे पाहा.

loksabha poll 2024
Loksabha Poll 2024 : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार, कोणत्या राज्यात किती मतदान? जाणून घ्या…
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….

हेही वाचा : World Wildlife Day 2024 : भारतातील धोक्यात असलेले पाच वन्यप्राणी कोणते? घ्या जाणून….

रॅफ्लेसिया अर्नोल्डी – जगातील सर्वात मोठे फूल

रॅफ्लेसिया अर्नोल्डी हे फूल सुमात्रा आणि बोर्नियो बेटांवर उगवते. या फुलाची उंची ही साधारण चार फुटापर्यंत वाढू शकते, तर त्याची रुंदी ही सुमारे तीन फूट इतकी असते. आता एवढ्या मोठ्या फुलाचा गंध कसा असेल, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मात्र, हीच आपण या फुलाची खासियत म्हणू शकतो. या फुलाला वास तर आहे, परंतु तो इतर फुलांप्रमाणे गोड नाहीये.

बीबीसीच्या डिस्कव्हरी वाईल्ड लाईफच्या एका लेखानुसार, रॅफ्लेसिया हे फूल उमलल्यानंतर त्याचा अत्यंत घाणेरडा असा दुर्गंध संपूर्ण जंगलात पसरतो. याच्या वासाचे वर्णन करायचे झाल्यास, रॅफ्लेसियामधून एखाद्या सडलेल्या किंवा सडक्या मांसासारखा कुजका वास येतो. त्यामुळे हे फूल उमलल्यानंतर घाणीवर बसणाऱ्या माश्यांशिवाय इतर कुणीही त्याच्याजवळ फिरकत नाही.

हे फूल साधारण पाच वर्षांनी उमलते. या फुलाला देठ किंवा पान असे काहीही नसते. केवळ उष्णकटिबंधीय बेटाच्या जमिनीवर या फुलांची भलीमोठी कळी आपल्याला पाहायला मिळते. या फुलाला लाल रंगाच्या अजस्त्र अशा पाकळ्या असतात. तसेच त्या पाकळ्यांवर पांढऱ्या रंगाचे मोठे ठिपके किंवा उंचवटे असतात. हे विचित्र फूल थोडे केसाळ असून याच्या मध्यभागी दात असल्याचादेखील भास होतो. अशा या कुजका वास असलेल्या फुलाला ‘कॉर्प्स फ्लॉवर’देखील म्हटले जाते.

हेही वाचा : Kiss Day 2024 : चुंबनाचे प्रकार किती? कोणत्या Kiss चा काय अर्थ असतो, जाणून घ्या…

या फुलातदेखील नर आणि मादी असे प्रकार असतात. या फुलाच्या दुर्गंधाने आकर्षित झालेल्या माश्यांद्वारे नर फुलांचे परागकण, मादी फुलापर्यंत पोहोचवून या फुलाची प्रजनन क्रिया केली जाते. रॅफ्लेसिया अर्नोल्डी ही एक परजीवी वनस्पती असून, जगातील सर्वात मोठ्या आकाराचे आणि अत्यंत घाणेरड्या वासाचे फूल म्हणून ओळखले जाते, असे डिस्कव्हरी वाईल्ड लाईफच्या लेखावरून तसेच, बीबीसी अर्थच्या युट्यूबवरील व्हिडीओच्या माध्यमातून समजते.