Viral Video : महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्रत्येक किल्ल्याची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. या गडकिल्ल्यांना दरदिवशी हजारो पर्यटक भेट देतात. गडकिल्ल्यांच्या यादीत काही गड किल्ले असे आहेत की जे अत्यंत खडतर आहे. या गडकिल्ल्यांची उंची आणि वाट अतिशय अवघड आहे. अशा गडकिल्ल्यांची सैर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियावर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ असलेला हरिअर किल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याला हर्षगड म्हणून सुद्धा ओळखतात. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या किल्ल्यावर पर्यटकांनी भयानक गर्दी केली आहे. एखादी चुक मोठ्या अपघातचे कारण ठरू शकते. सोशल मीडियावर काही लोक हा व्हिडीओ शेअर करून सत्रक राहण्याचे आवाहन करत आहे.

हरिहर हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या चढाईसाठी ज्या पायऱ्या आहेत, त्या अरुंद आणि उभ्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात या पायऱ्यांवरून पाय घसरण्याची जास्त शक्यता असते ज्यामुळे चढाई आणि उतरताना खूप धोका असतो.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हरिहर किल्यावरील भयानक दृश्य दिसेल. इथे पर्यटकांनी भयंकर गर्दी केली आहे. काही लोक चढताना तर काही लोक उतरताना दिसत आहे. भयंकर गर्दीत अरुंद आणि उभ्या पायऱ्यावरून लोक ये – जा करत आहे. ही मरणाची गर्दी पाहून काही लोकांना कदाचित संताप येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आधीच २०२५ मध्ये विनाशकारी घटना घडत आहेत, त्यात आणखी एक मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का? अशा आशयाचे पोस्ट शेअर करत युजर्सनी लोकांना सुनावले आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

व्हायरल व्हिडिओ

WokePandemic या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आणखी एक मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहात का.?

हरिहर किल्ल्यावर वीकेंडला गर्दी हा मृत्याचा सापळा वाटत होता. हे थांबवणे किंवानियंत्रित करणे आवश्यक आहे अन्यथा एक छोटीशी चेंगराचेंगरी झाल्यास किंवा एखाद्याचा तोल गेल्यास मोठा अपघात घडू शकतो आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडतील. संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल सतर्क करण्यासाठी टॅग करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर वीकेंडला गर्दी दिसून येते.” तर एका युजरने लिहिलेय, ही गर्दी भयानक आहे. इतक्या भयंकर चढाईसाठी कोणतेही सुरक्षा उपाय नाहीत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे पाहूनच अंगावर काटा येतो.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.