Viral Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर इत्यादी ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले असून ड्रोन नष्ट करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्त दिले. भारत पाकिस्तानात तणाव दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुट्टीवर आलेले जवान सीमेवर जाताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मोठ्या गाडीत दोन जवान जाताना दिसत आहे.
जवानांचा भावुक व्हिडीओ (Emotional Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका मोठ्या गाडीत दोन जवान जाताना दिसत असेल. एक जवान गाडी चालवताना दिसत आहे तर जवान त्याच्या शेजारी बसलेला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “प्रार्थना करा आम्ही जिंकून जिवंत परत येऊ” हे कर्तव्य बजावण्यासाठी बॉर्डरवर जात असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
fauji_prince_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देव सर्व सैनिक बांधवांची रक्षा करो” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही जिंकून येणार.. जय भवानी” आणखी एका युजरने लिहिलेय, “काही होणार नाही आमच्या सिंहाला..कोणत्याही देशात एवढा पावर नाही की भारतीय सैन्यांना काही करेन. भारतीय आर्मी खूप पावरफूल आहे” एक युजर लिहितो, “मनापासून सलाम. आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे” तर एक युजर लिहितो, “मी प्रार्थना करतो तुम्ही जिंकून सुरक्षित परत येणार.” अनेक युजर्सनी जवानांसाठी देवाजवळ प्रार्थना केली आहे. काही युजर्सनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर असे अनेक भावुक व्हिडीओ व्हायरल होत आहे.