Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या उन्हाळा सुरू आहे. सगळीकडे वातावरण चांगलंच तापलं आहे. या भर उन्हाळ्यात सगळ्यांची धाव थंड पाण्याकडे असते. काही लोक फ्रिजचे पाणी पितात तर काही लोक माठातील पाणी पितात. फ्रिजचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थंड पाणी पिण्यासाठी लोक सहसा माठाला अधिक पसंती देतात. उन्हाळ्यात कुठे घराबाहेर जायचा विचार केला की बरोबर थंड पाणी घ्यावे लागते पण फ्रिज किंवा माठातील पाणी कडकडत्या उन्हात जास्त वेळ थंड राहत नाही. अशावेळी गरम झालेले पाणी प्यावे लागते. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या समस्येवर तोडगा सांगितला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापूर शहरातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला गाडा दिसेल. या गाड्यावर मातीच्या बाटल्या ठेवल्या आहेत. आजवर तुम्ही मातीचे मडकी , भांडी, माठ बघितले असेल पण मातीची बाटली पाहून कोणीही थक्क होईल. या मातीच्या बाटलीतील पाणी थंड राहीन आणि तुम्ही भर उन्हात ही बाटली वापरू शकता.
या व्हायरल व्हिडीओध्ये एक तरुण सांगतो, “आज सकाळी मी नवीन विषय बघितला. मातीची अनेक भांडी बघितली आजवर पण पाण्याची बाटली पहिल्यांदा बघितली. उन्हात साई चौकातू कृष्णाकडे चाललो आणि डाव्या साइडला मला हा विषय दिसला. दिसल्यानंतर गाडी थांबवली आणि बघा म्हटलं की काय आहे? बघितल तर मातीची पाण्याची बाटली आणि त्यातही प्लास्टिकचं टोकन असलेली. हा विषय हार्ड वाटला. मग या उन्हाळ्यात कडकत्या उन्हात गार पाणी राहण्यासाठी नवीन ट्रेंडिंगचा विषय येतोय पुण्यात. भावांनो दिसलं तर घ्य लागतील फकत ८० रुपये.

पाहा व्हायरल व्हिडीओ

kolhapur_forever या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या उन्हाळ्यात नविन फ्रिज” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कसला विषय भावा, पोरानं २ फोडल्या” तर एका युजरने लिहिलेय, “ह्या बॉटलच्या गोल फडका बांधावा लागतो, तेव्हा पाणी गार अणि बॉटल टिकते” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी १०० रुपयांची बाटली अशीच परवाच घेतली विकत पण किस्मत कनेक्शन हातातून पडली आणी फुटली .. टोपण तेवढ राहिलं” अनेक युजर्सनी त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत.