कल्पना करा तुम्ही रस्त्यातून जात असताना अचानक सिंह रस्त्यात आले आहेत. इतकेच नाही तर या गोष्टीमुळे ट्रॅफीक जाम झाली आहे. असाच एक व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चारही सिंह अतिशय ऐटीत रस्त्यातून चालत आहेत आणि त्यांच्यामागे कार अतिशय संथ गतीने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडियो सगळ्यात आधी फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडियो अतिशय कमी वेळात २० लाखहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडियो दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमधील असल्याचे समोर आले आहे. जंगलाचा राजा म्हटल्या जाणाऱ्या या सिंहांनी कमी वेळात रस्त्यावरही कसा ताबा मिळवला हे या व्हिडियोमधून दिसत आहे. आता हे सिंह रस्त्यावर आल्यावर या रस्त्यावरुन जाणाऱ्यांची काय धांदल उडाली असेल ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. भर रस्त्यात अशाप्रकारे प्राणी येण्याच्या अनेक घटना घडतात. यामध्ये जंगलातून कधी वाघ तर कधी बिबट्या, हत्ती असे प्राणी रस्त्यावर येतात. पण अशाप्रकारे इतक्या संख्येने एकत्रित सिंह रस्त्यावर आल्याची घटना बहुदा पहिल्यांदाच घडली असावी. ही घटना कॅमेरात कैद झाल्याने त्यावरील चर्चांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of lions halting traffic at south africa kruger national park is going viral on social media
First published on: 13-01-2019 at 12:15 IST