एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला कारण म्हणजे या व्यक्तीने स्पाइसजेटच्या विमानात धूम्रपान केले आहे. इतकेच नाही तर त्याने धूम्रपान करतानाच स्वतःचा व्हिडीओही शूट केला आहे. हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस गुडगावस्थित इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर बॉबी कटारिया आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

या व्हिडीओमध्ये बॉबी एका सीटवर झोपून सिगारेट पेटवताना दिसत आहे. यानंतर तो धूम्रपान करतानाही दिसत आहे. ट्विटरवरील लोकांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना व्हिडिओ फ्लॅग केला. यानंतर, “या प्रकरणाची चौकशी करत आहे. अशा घातक वर्तन सहन केले जाणार नाही,” असे ट्वीट सिंधिया यांनी केले.

Viral Video : गर्दीच्या रस्त्यामधून वाट काढण्यासाठी पट्ठ्याने लढवली गजब शक्कल; असा देशी जुगाड तुम्ही कधी पाहिला का?

दरम्यान, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या सूत्रांनी सांगितले की त्यांनी या घटनेची दखल घेतली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योग्य ती कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. याउलट, बॉबी मात्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा बचाव करताना दिसला. त्याने या घटनेशी संबंधित अनेक बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर करून चांगली टीआरपी मिळवलेल्या वृत्तवाहिन्यांवर जोरदार टीका केली.

प्रवाशांची गैरसोय होण्याव्यतिरिक्त, विमानाच्या केबिनमध्ये धुम्रपान केल्याने आग लागण्याचा गंभीर धोका असतो. भारतात प्रवासी विमानात धुम्रपान करण्यास बंदी आहे. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने आज एका निवेदनात म्हटले आहे की जानेवारी २०२२ मध्ये जेव्हा व्हिडीओ त्यांच्या निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती आणि एअरलाइनने गुडगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवक्त्याने सांगितले की, “तपासणीतून समोर आलेला व्हिडीओ, २० जानेवारी २०२२ रोजी दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी ७०६ या फ्लाइटमध्ये प्रवासी चढत असताना शूट करण्यात आला होता,” या कृत्याबद्दल प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही माहिती नव्हती. ही बाब २४ जानेवारी २०२२ रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे एअरलाइनच्या निदर्शनास आली,” असे एअरलाइनने सांगितले.