कोणताही सण-समारंभ असू दे किंवा आनंदाची बातमी सांगायची असू दे, मिठाईचे डबे घरी आल्याशिवाय त्या आनंद अन् उत्साहाला मजाच येत नाही. दहावीची परीक्षा पास झाल्याचे पेढे ते लग्नाचे लाडू इथपर्यंत अगदी लहानातल्या लहान कारणापासून ते मोठ्या गोष्टींपर्यंतची आनंदाची वार्ता नातेवाईक, मित्रपरिवाराला कळविण्याआधी त्यांचे तोंड गोड करतो. या मिठायांमध्ये पेढे, बर्फी यांच्या जोडीला अजून एक पदार्थ असतो तो म्हणजे बुंदीचा लाडू!

पिवळ्या किंवा केशरी रंगाचा व तोंडात विरघळणारा बुंदीचा लाडू दिवाळी, गणपती अशा सणांदरम्यान तर आणला जातोच; पण लग्नघरातही अगदी आवर्जून सापडतो. लाडू आणि लग्न यांसाठी हिंदीमध्ये ‘शादी का लड्डू’, अशी एक भन्नाट म्हणदेखील आहे. मात्र, तुम्ही मिठाईच्या दुकानात पॅकबंद मिळणारे बुंदीचे स्वादिष्ट लाडू ऑटोमॅटिक मशीनमध्ये कसे बनविले जातात हे पाहिले आहे का?

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ

हेही वाचा : वृद्ध सफाई कर्मचाऱ्याने तरुणाला दिले आशीर्वाद! पाहा ‘माणुसकीचे’ दर्शन घडवणारा सुंदर Video

मिठाईच्या दुकानातील हलवाईला तुम्ही हे मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू हाताने बनवताना पाहिले असेलच. मात्र, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सध्या ऑटोमॅटिक मशीनमधून तयार केल्या जाणाऱ्या बुंदीच्या लाडवांचा एक भारी व्हिडीओ शेअर झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुपाचे दोन भलेमोठे डबे उघडून, ते कढईमध्ये ओतण्यात आले आहेत. त्यामध्ये लाडूसाठी बुंदी तळून तयार केली आणि नंतर [कदाचित] पाकामध्ये ती तयार बुंदी उकडून घेतली. आता बुंदीचे घट्ट झालेले मिश्रण एका मोठ्या स्वच्छ घमेल्यात झारीच्या मदतीने छान ढवळून घेण्यात आले.

त्यानंतर बुंदीच्या लाडवांना एकसमान गोल आकार देण्यासाठी घमेल्यातील बुंदीचे मिश्रण एका मध्यम आकाराच्या स्टीलच्या मशीनमध्ये एक व्यक्ती घालण्यास सुरुवात करते. त्याबरोबर मशीनच्या पुढच्या भागाला लाडूचा साचा असणारा एक पट्टा आपल्याला दिसतो. त्या पट्ट्यामध्ये साधारण मध्यम आकाराचे सुंदर केशरी रंगाचे लाडू तयार झालेले आपल्याला दिसतात. हळूहळू तो साच्याचा पट्टा पुढे पुढे सरकतो आणि तयार झालेले लाडू तिथे काम करणाऱ्या व्यक्ती हाताने उचलून दुसऱ्या स्वच्छ ट्रेमध्ये गोळा करून घेतात.

आता एक कर्मचारी गोळा केलेल्या आणि न तुटलेल्या लाडवांवर थोडासा सुका मेवा लावून ठेवतो. शेवटी मिठाईच्या दुकानात दिसणाऱ्या आणि आतमधून सोनेरी रंग असणाऱ्या डब्यांमध्ये बुंदीचे लाडू एका ओळीत भरून घेतो. आपल्याला दुकानात मिळणारे मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू अशा पद्धतीने ऑटोमॅटिक मशीनमध्ये तयार होतात.

हेही वाचा : पोळ्या लाटण्याचा अजून एक ‘नवा’ जुगाड! पण Video पाहून नेटकरी म्हणाले, “एवढ्या वेळात…”

बुंदीच्या लाडूच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात पाहा :

“वाह भन्नाट!”, असे एकाने म्हटले आहे. “अरेच्चा! हे लाडू तळलेले असतात ते मला माहीतच नव्हते,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. काहींनी छोटा भीम कार्टूनचा संदर्भ देऊन, “टुणटुण मौसीला तुमचा पत्ता हवा आहे”, असे तिसऱ्याने लिहिले आहे. तर चौथ्याने, “महाराज, हे यंत्र आपल्या ढोलकपूरमध्ये स्थापित केले पाहिजे”, असे छोटा भीम म्हणेल, अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @thefoodiehat नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत १.७ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.