स्वच्छता किंवा सफाई कर्मचारी हे आपली बिल्डिंग, सोसायटी, शहर आणि संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी अक्षरशः दिवसरात्र मेहनत करत असतात. आपण एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले तरी त्या कार्यक्रमाची जागा, कार्यक्रमात ज्या ‘यूज अँड थ्रो’ ताटांमधून जेवतो अशा ताटांचा आणि ग्लासेसचा कचरा गोळा करण्याचे कामदेखील हे सफाई कर्मचारी करत असतात. खरंतर त्यांच्या या कामामुळेच आपण सगळे स्वच्छतेचा अनुभव घेऊ शकतो. परंतु, कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कामगाराला समाजातील बहुतांश लोक कधीही चांगल्या किंवा आपुलकीच्या नजरेने पहात नाहीत.

मात्र, सध्या सोशल मीडियावर माणुसकी दाखवणारा, तसेच सफाई कर्मचारीदेखील आपल्यापैकीच एक आहेत आणि त्यांच्याशीदेखील तरुण पिढीने आपुलकीने वागले पाहिजे, असा संदेश देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेमके असे काय आहे ते पाहू. व्हिडीओच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात वृद्ध सफाई कर्मचारी जमिनीवर ठेवलेल्या जेवणाच्या ताटल्या उचलताना दिसत आहे. तेव्हा कवलजीतने [व्हिडीओ शेअर करणारी व्यक्ती] त्या कर्मचाऱ्याला आपल्याबरोबर जेवण करण्यासाठी बोलावले.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

हेही वाचा : पोळ्या लाटण्याचा अजून एक ‘नवा’ जुगाड! पण Video पाहून नेटकरी म्हणाले, “एवढ्या वेळात…”

सुरुवातीला ती वृद्ध व्यक्ती, ‘ते ज्यांच्या हाताखाली काम करत आहेत त्यांना आवडणार नाही म्हणून थोडे नको म्हणत होते’, मात्र कवलजीतने त्यांना विश्वासात घेतल्यावर तो सफाई कर्मचारी तयार झाला. त्यानंतर कवलजीतने त्या व्यक्तीला जेवणाचे भरलेले ताट हातात दिले. तसेच थोड्यावेळाने एक मोठा खोका उघडून त्यामध्ये असलेल्या पिझ्झाचा एक तुकडासुद्धा त्या व्यक्तीला आग्रहाने वाढला. दरम्यान दोघांच्या गप्पा सुरू असताना, “आपण जो कचरा करतो, तो साफ करण्याचे काम हे काका करतात. दिवसाचे १२ तास हे काम करून त्यांना दिवसाखेरीस ४०० रुपये मिळतात”, अशी माहिती कवलजीत आपल्याला देतो.

जेवण सुरू असताना, कवलजीत थंडगार कोल्ड्रिंकचा ग्लास त्या व्यक्तीला देतो. गार पेयाचा घोट पोटात गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधानाची भावना आपल्याला दिसते. व्हिडीओच्या शेवटी कवलजीत मदत म्हणून थोडे पैसे त्या वृद्ध सफाई कर्मचाऱ्याच्या खिशामध्ये ठेवून देतो आणि त्या व्यक्तीला दोन्ही हात जोडून वाकून नमस्कार करतो. त्याबरोबर ती वृद्ध व्यक्तीदेखील कवलजीतला नमस्कार करते, तसेच त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देते; असे आपण या संपूर्ण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

हेही वाचा : Video : साखरेवर ठेवायचे आहे नियंत्रण? मग, ‘लाल’ रंगाच्या कपाचा करा वापर! पाहा अजब व्हायरल टीप

अशा या माणुसकी जपणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहा :

“माणुसकी अजूनही अस्तित्वात आहे!” असे एकाने लिहिले आहे. “मन जिंकले” दुसऱ्याने लिहिले. “देवाचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहू दे”, असे तिसऱ्याने म्हटले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @kawalchhabra नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १३.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.