Premium

यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही! नवजात बाळानं आईला मारली मिठी; Video पाहून तुम्हीही…

viral video : आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. 9 महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करुन आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं.

Video Of Newborn Baby
नवजात बाळानं आईला मारली मिठी (Photo – twitter)

viral video : आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो.आई होण्याचा आनंद गगनापेक्षाही मोठा असतो.आई होण्यासाठी एका ‘स्त्री’ला किती वेदना सहन कराव्या लागतात. मात्र आपल्या बाळासाठी ती सर्व वेदना हसत हसत सहन करते. 9 महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून हे बाळ जगात आल्यानंतर तर आईचा आनंद गगनात मावत नाही. असाच एक आई आणि नवजात बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवजात बाळाची आईला घट्ट मिठी –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेने नुकतंच एका बाळाचा जन्म दिलाय. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला त्याच्या आईकडे दिलं. दरम्यान आईकडे जाताच या बाळाने आईला घट्ट मिठी मारल्याचं दिसत आहे. बाळाने आईच्या गालावर हात ठेवला आहे. नऊ महिन्यानंतर आईची भेट झाली आणि आता आईला सोडायचंच नाही अशा प्रकारे दृश्य या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 9 महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून हे बाळ जगात आल्यानंतर त्या आईला होणारा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शेवटी आई ती आईच..! पर्यटकांना दगड मारणाऱ्या चिपांझीला त्याच्याच आईनं बदडलं; Video पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तसेच, अवघ्या 22 सेकंदांचा हा व्हिडिओ 5 लाख 88 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 16 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आयुष्यात यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही’, असे काहीजण म्हणत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला @The Figen या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of newborn baby holding mothers face everyone is shocked to see video viral goes viral netizens in awe srk

First published on: 27-03-2023 at 13:36 IST
Next Story
शेवटी आई ती आईच..! पर्यटकांना दगड मारणाऱ्या चिपांझीला त्याच्याच आईनं बदडलं; Video पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर