Pune Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि गडकिल्ले या शहराचा इतिहास सांगतात. पुण्यात असे ठिकाणे आहे, जे बघण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. पुणे शहरासह पुण्यातील आजुबाजूचा परिसर सुद्धा अत्यंत निसर्गरम्य आहे. पुण्याजवळ असे अनेक सुंदर निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जिथे पर्यटक खूप गर्दी करतात. तुम्ही पुण्याजवळचा पळसे धबधबा पाहिला आहे का? हा धबधबा पुण्यापासून फक्त २० किमी आहे. हा धबधबा पाहून तुम्हाला या ठिकाणी जावंस वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पळसे धबधबा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला सुंदर पळसे धबधबा दिसेल. हा धबधबा उंच कड्यावरून खाली पडताना दिसत आहे. पांढरा फेस असलेला पाण्याचा प्रवाह आणि खडकावरून वाहत असलेले पाणी पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला या ठिकाणी लोकांची गर्दी सुद्धा दिसेल. लोक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहे तर काही लोक धबधब्यासमोर फोटो किंवा व्हिडीओ काढत आहे.
पळसे धबधबा हा ताम्हिणी घाटाजवळ आहे आणि एक दिवसाच्या ट्रिपसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त पावसाचा अंदाज घेऊन आणि सतर्कता बाळगून कोणत्याही धबधब्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि आनंद लुटू शकता. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यापासून फक्त २० किमी. पळसे धबधबा हाऊसफूल”

पाहा व्हायरल व्हिडीओ

puneri_explorer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला पळसे धबधबा ओथंबून वाहतोय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याजवळ आणि ताम्हिणी घाट परिसरात असे अनेक लहान मोठे धबधबे आहेत, जे बघायला लोक पावसाळ्यात प्रचंड गर्दी करतात. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे घाटाच्या रस्त्यातून वाहने चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे तसेच धबधब्याच्या ठिकाणी भिजताना सतर्क राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आपली एखादी चूक महागात पडू शकते आणि शक्यता वीकेंडला गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.