Viral Video : सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. काही तरुण मंडळी पाटीवर कधी मजेशीर तर कधी विचार करण्यास भाग पाडणारे संदेश लिहितात आणि ही पाटी हातात घेऊन रस्त्यावर उभी राहतात. जेव्हा येणारे जाणारे त्या पाटीकडे बघून प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एक मजेशीर पण तितकाच सुंदर संदेश या पाटीवर लिहिलाय. या तरुणाने नेमकं काय लिहिलेय, हे आज आपण जाणून घेऊ या.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे आणि येणारे जाणारे लोक त्या पाटीकडे बघताहेत. काही लोक सहमती सु्द्धा दर्शवतात तर काही लोक खळखळून हसताना दिसतात. काही जण हा या तरुणाच्या पाटीचा व्हिडीओ आणि फोटो सुद्धा काढताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तरुणाने या पाटीवर नेमकं काय लिहिलेय?
या पाटीवर लिहिलेय, “स्वत:ला पुण्यात एक फ्लॅट घ्यायला ६० वर्षे लागली आणि जावई मात्र २५ व्या वर्षी २ फ्लॅटवाला पाहिजे.. वाह रे दुनिया!” हा संदेश वाचून कोणीही थक्क होईल.
हल्ली मुलींसाठी वर शोधताना वधूपक्षाच्या अनेक मागण्या असतात. त्यातील एक मागणी असते की त्याचं घर असावं किंवा फ्लॅट असावा. याला प्रतिउत्तर म्हणून पुण्यातील तरुणाने चोख संदेश लिहिलाय. मुलाचे पुण्यात दोन फ्लॅट असावेत अशी मागणी करणाऱ्या वधू पक्षाला पुणेरी भाषेत हा टोमणा दिला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
devesh_kale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “२ फ्लॅटवाला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी मनातलं बोलला भाऊ” तर एका युजरने लिहिलेय, “अन् ‘पापा की परी’ ला मुलगा “एकुलता एक” हवा ते वेगळं…” आणखी एका युजरने लिहिलेय, “याचा अर्थ पैसा कमवा” अनेक युजर्सनी या संदेशावर सहमती दर्शवली आहे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.