Viral Video : सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे अनेकांचे नुकसान होते. विशेष म्हणजे लग्न समारंभादरम्यान जेव्हा धो धो पाऊस पडतो तेव्हा प्रचंड मोठे नुकसान होते. लग्नात जर पाऊस पडला तर सर्वांची एकच तारांबळ उडते. कुणालाही काहीही सुचत नाही. सर्वजण पाण्यात भिजू नये म्हणून इकडे तिकडे पळतात पण आज आपण एक असा व्हिडीओ पाहणार आहोत, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसेल जी धो धो पावसात पोट भरून जेवण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरणार नाही. अन्न वाया घालवले नाही म्हणून या व्यक्तीचे अनेक युजर्सनी कौतुक सुद्धा केले आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जेवणाचे स्टॉल आणि जेवणासाठी टेबल खूर्चीचा सेटअप लावला आहे. पण धो धो पाऊस पडत असल्याने लोक जेवण सोडून सैरावैरा पळताना दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही व्यक्ती या भर पावसात सुद्धा हातातील ताट सोडत नाही आणि मनसोक्त जेवण करताना दिसते. धो धो पावसात भिजत असताना सुद्धा ही व्यक्ती पोटभरून जेवण करताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
irfan__shaikh_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शादी मुबारक” अनेक युजर्सनी या व्यक्तीचे कौतुक सुद्धा केले आहे. अन्नाची किंमत ही व्यक्ती जाणते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिलेय, “भावा कर जेवण, तुम्हाला माहितीये नाही जेवण नशीबाने मिळते.” तर एका युजरने लिहिलेय, “अन्नाची किंमत फक्त गरीबच समजू शकतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा सॅल्युट आहे तुम्हाला, तुम्ही जेवण वाया घालवले नाही.” एक युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला भूक लागली” तर एक युजर लिहितो, “श्रीमंताना माहिती नाही या जेवणाची किंमत” एक युजर तर लिहितो, “भावाने मन जिंकले” सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.