अनेकदा प्रवासादरम्यान, विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करताना आपण फोनवर एखादा सिनेमा किंवा विविध व्हिडीओ बघत असतो. मात्र बराचवेळ फोन धरून, हाताला रग लागते. हात दुखू लागतो. अशावेळेस काय बरं करावे असा प्रश्न पडतो. याचे अत्यंत सोपे आणि भन्नाट असे उत्तर विमानात प्रवास करण्याऱ्या एका तरुणीने शोधून काढले आहे. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र ही युक्ती नेमकी कशी वापरली आहे ते पाहू.

डॅनिश कंटेन्ट क्रियेटर इदा ऑगस्टा [Ida Augusta] नामक तरुणीने ही ट्रिक आपल्या @idaaugusta या अकाऊंटवरून व्हिडीओमार्फत शेअर केली आहे. आपल्या फोनला आपण जे कव्हर घालत असतो त्याचा उपयोग इदाने, फोन हातात न धरता व्हिडीओ पाहण्यासाठी केला आहे. व्हिडिओमध्ये, ही तरुणी आपल्या मैत्रिणीसह विमानात असल्याचे आपण पाहू शकतो. विमानात आपण बसतो त्या सीटच्या, समोरच्या सीटवर एक लाल रंगाचे कापड घातले होते. त्या कापडाच्या मागच्या बाजूस फोन कव्हर ठेऊन, समोरील बाजूने फोन त्या कव्हरमध्ये घातला. ज्यामुळे ते लाल कापड, फोन आणि कव्हर या दोघांमध्ये व्यवस्थित अडकले आणि फोन अधांतरी राहिला. आता, या ट्रिकमुळे तरुणी तिला हवा तितकावेळ, फोन हातात न धरता व्हिडीओ किंवा एखादा कार्यक्रम अगदी सहज पाहू शकते.

हेही वाचा : खाद्यप्रेमींसाठी नवा ‘Fusion’ पदार्थ होतोय व्हायरल; ढोकळ्यासह केलेल्या प्रयोगावर नेटकरी म्हणाले…”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी शेअर झाला होता. साधी सोपी परंतु तितकीच उपयुक्त अशी ट्रिक इदाने दाखवल्यानंतर, सोशल मिडियवरील नेटकऱ्यांमध्ये मात्र यावरून चर्चा होत आहे. काहींच्या मते असे करणे काही योग्य नाही. तर काहींना ही युक्ती भारीच आवडली असल्याचे त्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांमधून समजते. काय आहेत नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाहा.

एकाने, “जोपर्यंत त्या कव्हरमधून फोन खाली पडत नाही, तोपर्यंत ही कल्पना भारी आहे.” असे लिहिले आहे. दुसऱ्याने, “असे करणे मला जरा चुकीचे वाटत आहे.” असे म्हणत आपले मत मांडले आहे. तर एकाने केवळ हसण्याच्या इमोजी टाकल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३६.७K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.