Horse Girl Video : आपल्यापैकी अनेकांना घोड्यावर बसून शर्यतीत भाग घेण्याचे स्वप्न पाहिले असेल. मोठ्या मोठ्या खडकावर उड्या मारत घोडेस्वारी करण्याची इच्छा असेल. घोड्याप्रमाणे वेगात धावायला कोणाला आवडणार नाही? तुम्ही कधी विचार केला का, जर तुम्ही घोडा बनला तर काय होईल? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहेत पण आज आपण एक अविश्वसनीय प्रकरणाविषयी जाणून घेणार आहोत. नॉर्वेत राहणाऱ्या आयला क्रिस्टीन नावाच्या मुलीने घोडा बनण्याचा निर्णय घेतला आणि तिने काही प्रमाणात यशही मिळवले. सध्या या हॉर्सगर्लची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मुलांना मोठं होऊन अंतराळवीर, युट्युबर्स, इंजिनिअर, डॉक्टर, पायलट, क्रिकेटर बनण्याची इच्छा असते पण आयलाला वयाच्या चौथ्या वर्षापासून प्राणी व्हायचे होते. सुरुवातीला तिला कुत्र्यांचे खूप कौतुक वाटायचे त्यामुळे ती त्यांच्यासारखे चार पायांवर चालायची, पण नंतर तिला जाणवले की घोडे कुत्र्यांपेक्षा जास्त सुंदर आणि उमदे असतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ती घोड्याप्रमाणे चार पायांवर म्हणजे दोन हात आणि दोन पायांचा वापर करत वेगाने धावते. उंच उड्या मारते. तिचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल

मग काय घोड्यांचे अनुकरण करणे हा आयलाचा छंद बनला पण त्याबरोबर तिने तिच्यामध्ये परिवर्तन केले. तिने एका दिवसात घोड्यांच्या स्वभाव आत्मसात केला नाही. तिने अनेक वर्ष प्रशिक्षण घेतले आणि आज या मेहनतीच्या जोरावर ती आज घोड्याप्रमाणे सहज धावते आणि मोठ्या उड्या मारते.

आयला बाबत विशेष बाब म्हणजे आयला पूर्णपणे एक सामान्य मुलगी आहे. ती तिच्या भावना व्यक्त करते, अनुभव शेअर करते आणि तिला माणसांप्रमाणे इच्छा आकांक्षा आहेत आणि तिच्याकडे मानवी कौशल्य आहेत. ती घोड्यासारखी उभी राहून झोपत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे आयला क्रिस्टीन ही पहिला महिला नाही जी घोड्याप्रमाणे धावते अन्ना स्लँडर नावाची एक महिला २०१३ मध्ये चार पायांवर धावताना दिसली होती