कुरकुरीत आणि कोणत्याही जेवणाची चव वाढवण्याचे काम करणारा पदार्थ म्हणजे पापड! घरी असताना, गरमागरम खिचडी त्यावर तूप आणि बाजूला उडदाचा कुरकुरीत पापड हा हवाच. नाहीतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरवातीला मसाला पापड तरी हमखास मागवला जातो. मात्र थोडे जिरे, मीठ आणि हलके मसाले घातलेला पापड पारंपरिक पद्धतीने तयार होताना तुम्ही कधी पाहिले आहे का?

सोशल मीडियावर पापड बनवण्याची पारंपरिक पद्धत @streetfoodrecipe या अकाउंटने शेअर केली आहे. त्यामध्ये सुरवातीला एक स्त्री चुलीवर तापत ठेवलेल्या एका मोठ्या पातेल्याच्या झाकणावर पापडाचे पीठ डोश्याप्रमाणे पसरते. पापडाचे पीठ शिजल्यानंतर हाताने तो बाजूला काढून घेते. आता दुसरी स्त्री शिजलेल्या मोठ्या आकाराचे पापड वाळवण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या शीटवर पसरवते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

हेही वाचा : या पठ्ठ्याने चक्क Amazon वरून मागवले राहण्यासाठी घर! आतून कसे दिसते पाहा

आता अर्धवट वाळलेल्या या पापडाच्या ढिगावर तिसरी स्त्री मोठ्या आकाराची एक वाटी ठेवते आणि त्या वाटीवर उभी राहून, पायाने वजन देऊन लहान आणि गोल आकाराचे पापड कापून घेते. शेवटी काही मनुष्य हे लहान आकाराचे पापड सुटे करून पुन्हा प्लॅस्टिक शीटवर वाळवण्यासाठी ठेवून देतात. असे आपल्याला व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

नीट निरखून पहिले तर, या व्हिडीओमध्ये पापड बनवताना आजूबाजूला कुठेही घाण दिसत नाहीये. सगळ्या वस्तू अगदी स्वच्छ आहेत. मात्र तरीही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहताना एक गोष्ट चांगलीच खटकली असल्याचे त्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेवरून दिसते. ती गोष्ट म्हणजे, पापडांवर वाटी ठेऊन त्यावर उभे राहणे. या क्रियेवर नेटकरी नेमके काय म्हणाले ते पाहू.

हेही वाचा : आईचा Joke ऐकून कोमातून बाहेर आली लेक! पाच वर्षांनंतर दोघींच्या चेहऱ्यावर दिसला आनंद

“सगळं काही छान सुरु होत… पण मग ती बाई त्या पापडांवर उभी राहिली!” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “आजपासून मी पापड खाणे बंद केले आहे.” असे लिहले आहे. तिसऱ्याने, “म्हणून बाहेरचे पदार्थ खायचे नसतात. घरी बनवलेले पदार्थ खा.” अशा काहींच्या प्रतिक्रिया होत्या.

मात्र काहींनी अशा नकारात्मक प्रतिक्रिया लिहिणाऱ्यांना खडेबोल सुनावल्याचेही कमेंट्समध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये एकाने “वाईन बनवण्यासाठी द्राक्षांनासुद्धा पायांनीच तुडवले जाते. त्याकडे सगळे दुर्लक्ष करून वाईनच्या एका बाटलीसाठी हजारो रुपये मोजतात. मात्र इथे येऊन स्वच्छतेबद्दल भाषण देत आहेत.” अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. तर शेवटी दुसऱ्याने, “त्या सर्व पापडांना उन्हात खडखडीत वाळवले आहे. घरी आणल्यानंतरदेखील आपण या पापडांना भाजून किंवा तळून खातो. असे करत असताना त्यामधील सर्व जंतू मारले जातात. त्यामुळे हे पापड खाण्यासाठी अगदी सुरक्षित आहेत.” असे म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @streetfoodrecipe या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओवर आत्तापर्यंत ८०.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.