Pregnant Lady Dance On Kuch Kuch Hota Hai Video: बाळाच्या जन्माची चाहूल लागल्यापासून ते बाळाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक लहानसहान गोष्टींची काळजी आई घेत असते. प्रत्येक आईची पद्धत कदाचित वेगवेगळी असावी पण स्वतःच्या बाळासाठी काय चांगलं काय वाईट याची समज मात्र प्रत्येक आईला असतेच. दुर्दैवाने, मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओजकडे पाहून वेगळ्या पद्धतीच्या नावावर केलेले प्रयोग अगदीच भीतीदायक असतात असंही म्हणावं लागेल. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या ऑनलाईन चर्चेत आला आहे. यामध्ये आपण पाहू शकता की, एक गर्भवती महिला नाचताना दिसत आहे. तिचा वेग आणि उड्या मारण्याची पद्धत पाहून नेटकरी घाबरूनही गेले आहेत आणि तितकेच संतापले आहेत. प्रचंड ट्रोल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नेमकं असं आहे तरी काय, पाहूया..

ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला हॉस्पिटलच्या वॉर्डात दिसतेय. गर्भवती प्रमाणे तिचं पोट दिसतंय, आधी ती कॅमेऱ्याकडे बघून हळहळू चालत जाते, तोपर्यंत अगदी गोड गोजिरा वाटणारा हा व्हिडीओ तिचा डान्स सुरु होताच सगळ्यांच्या भुवया उंचावू लागतो. खरं सांगायचं तर कौतुक वाटावं असं नाचूनही ती ज्या वेगाने आणि ऊर्जेने नाचत होती ते बघून बाळाची काळजी वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. एका युजरने कमेंट करून असाही अंदाज बांधलाय की हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल व्हायला आलेल्या गर्भवती महिला इतक्या उर्जावान असतात हेच आम्ही पहिल्यांदा पाहतोय. कदाचित ही डान्सर तरुणी पोटाला काहीतरी बांधून डान्स करत असावी. आता यातलं नेमकं खरं काय, हे तुम्ही एकदा व्हिडीओ बघून कळतंय का, सांगा..

हे ही वाचा<< भाजप प्रदेशाध्यक्षांना जमावाकडून मारहाण, भररस्त्यातील ‘त्या’ हल्ल्याचा Video चर्चेत; घटनेचं मूळ वेगळंच!

हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी टीकात्मक कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी म्हटलंय की, स्वतःच्या बाळाचा जीव धोक्यात घालायची काय गरज, एवढे लाईक्स महत्त्वाचे आहेत का? काहींनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. बाळ आत डिस्को करत असेल, बाळ म्हणेल, आईची रील झाली की मला उठवा, ताई इथेच डिलिव्हरी होऊन जाईल. अशा खूप कमेंट्समधून नेटकरी गंमतीत टिपण्णी करताना दिसतायत. कदाचित या महिलेला तिचं शरीर अशी साथ देत असावं पण म्हणून इतरांनी हा प्रयोग करून पाहू नये. बाकी तुमचं या व्हिडीओवर काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा.