Sachin Tendulkar Emotional Post: सचिन तेंडुलकरने पॅरा क्रिकेटर अमीर हुसैनच्या क्रिकेटप्रतीच्या समर्पणाचे कौतुक करणारी एक खास पोस्ट आपल्या X अकाउंटवर शेअर केली होती, जी पाहून क्रिकेट प्रेमींचे डोळे पाणावले आहेत. मुंबईतील इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या उद्घाटनाच्या सामन्यात सचिन तेंडुलकर सुद्धा उपस्थित होता त्यावेळेस तेंडुलकरचीच जर्सी घालून ‘खरा लेग स्पिनर’ मैदानात खेळताना दिसला होता. आमिर हुसैन हा ३४ वर्षीय क्रिकेटर असून त्याच्या अनोख्या खेळाच्या पद्धतीसाठी ओळखला जातो, आमिर हा दिव्यांग खेळाडू असून तो त्याच्या खांद्याचा, मानेचा आणि पायाचा वापर करून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा करतो.

सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रत्येक चेंडूवर अडथळ्यांना तोंड देणारा आमिर खरा लेग स्पिनर आहे, आमिर तू सर्वांसाठी प्रेरणा आहेस,” तेंडुलकरच्या या पोस्टमधील प्रत्येक शब्द खरा आहे हे आपल्याला व्हिडीओ पाहून लक्षात येईलच. यामध्ये आपण पाहू शकता की, आमिरने सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना आपल्या पायाने सीमारेषेच्या जवळ इतक्या चपळाईने चेंडू अडवला की तेच पाहून आधी प्रेक्षक थक्क झाले होते पण खरी कमाल तर पुढे होती. आमिरने आपल्या पायाने मुन्नावर फारुकी समोर असताना गोलंदाजी केली होती. भल्या भल्या खेळाडूंना जमणार नाही इतकं कमाल कसब दाखवून त्याने अचूक गोलंदाजी केली, त्याहीनंतर त्याने चक्क आपल्या खांद्यांच्या आणि मानेच्या मध्य बॅट पडकून पाच चेंडूंमध्ये ३ धावा सुद्धा काढल्या.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

खरं सांगायचं तर आमिरचा खेळ तर कमाल होताच पण त्याहीपेक्षा खेळताना त्याच्या व स्वतः सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद व अभिमान पाहणं खास ठरत आहे. याच पद्धतीच्या भावना अनेकांनी कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त केल्या आहेत.

Video: आमीरची श्रीमंत कला

हे ही वाचा<< रोहित शर्माची जीभ घसरली, बाद देताच अंपायरला भरमैदानात म्हणाला.. IND vs ENG कसोटी सामन्यातील Video चर्चेत

कोण आहे आमिर हुसैन?

आमिर हुसैन लोन जेव्हा एका प्रशिक्षकाच्या नजरेत आला तेव्हा त्याची प्रतिभा जगासमोर येण्याची खरी सुरुवात झाली. २०१३ पासून तो क्रिकेट खेळत आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्याने वडिलांच्या मिलमध्ये एका अपघातात दोन्ही हात गमावले होते. फेब्रुवारीमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असताना सचिनने आमिरला भेटून एक वचन दिले होते. तेव्हा त्याने आमीरसह क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आता थेट मुंबईतील इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये तेंडुलकरच्याच जर्सीमध्ये आमिरला मैदान गाजवता आले होते.