Anand Mahindra shared video of street vendor : सध्या अनेक व्यापारी त्यांचे छोटे-छोटे व्यवसाय करताना दिसत आहेत. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना परवडणारे, पोटभर अन्न मिळावे, असा अनेक व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अगदी स्वस्तात मस्त, पौष्टिक असे खाद्यपदार्थ विक्रेता ग्राहकांना खाऊ घालतो. तर हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रासुद्धा कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत. नक्की काय आहे या ग्राहकाची खासियत चला लेखातून पाहूया…

व्हायरल व्हिडीओत (Video) एक ग्राहक या विक्रेत्याकडे फक्त ५० रुपयांची नोट घेऊन जातो. विक्रेता स्टॉलवर दाल मखनी, शाही पनीर, बुंदी रायता, कोशिंबीर, चटणी व दोन मोठ्या बटर नानसह ५० रुपयांची ‘दिल खुश’ थाळी विकताना दिसत आहे. तसेच या विक्रेत्याची खास गोष्ट अशी की, तुम्ही दोन, तीन, चार अगदी कितीही वेळा भाजी संपल्यावर रिफिल करा; विक्रेता तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही आणि कोणतेही अतिरिक्त शुल्कसुद्धा आकारणार नाही, असे खाद्यविक्रेता व्हिडीओमध्ये सांगतो आहे. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…‘पल पल दिल के पास…!’ मालकाच्या सुरेल आवाजाला श्वानाच्या सुराची साथ; VIDEO तील ‘ती’ गोष्ट पाहून म्हणाल, ‘खूपच छान…’

व्हिडीओ नक्की बघा…

आनंद महिंद्रांनी केलं कौतुक :

अगदी प्रेमळ स्वभावाच्या आणि स्वस्तात मस्त पदार्थ विकणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि आनंद महिंद्रा यांनी तो पहिला. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, ‘या विक्रेत्याला देशाचा महागाई विरोधी झार (anti-inflation Tsar of the country) नेमावा…’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. ‘Tsr’ हा एक प्राचीन शब्द आहे; जो भूतकाळातील रशियन सम्राटाचा संदर्भ देतो, असे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) आनंद महिंद्रा यांनी @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून सगळेच विक्रेत्याचे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून एक युजर म्हणाल की, “@zomato, कृपया हे हॉटेल आणि हा माणूस शोधा”, दुसरा युजर म्हणाला की, “या व्यावसायिकाला केवळ नफा मिळवण्यापेक्षा समाजासाठी योगदान देण्यात जास्त समाधान मिळते”, तिसरा युजरने “हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचे कौतुक केलं आहे आणि म्हंटले की, “छान लोकांच्या सर्व चांगल्या, प्रेरणादायी गोष्टी इतरांपर्यंत पोहचवण्याचा तुमचा मार्ग खरोखर छान आहे.” ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.