Video Shows Father And Daughter Love : लेक आणि वडिलांचे नाते हे जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. मोठेपणी मुलींना कायम त्यांच्या बाबांसारखा जोडीदार मिळावा, अशी इच्छा असते; तर मुलांना कायम एक गोंडस मुलगी जन्माला व्हावी, असे वाटत असते. त्यामुळेच की काय हे नाते काळ बदलला तरीही आजही तसेच आहे. तर, आज सोशल मीडियावर बाबा-लेकीचं नातं कसं असतं, हे दाखविणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एका आईने बाबा आणि लेकीचा खास क्षण कॅप्चर केला आहे…

व्हायरल व्हिडीओच्या (Video) सुरुवातीला एक चिमुकली मांडी घालून बसलेली दिसते आहे. माहिरा @mahira_3647 या चिमुकलीच्या आईने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आईने माहिराच्या बाबांना जेवायला वाढलेले दिसते आहे. एकाच ताटात बाबा आणि लेक जेवताना दिसत आहेत. बाबा पोळीचा एक तुकडा लेकीसाठी तोडून ठेवतो आणि दुसरा पोळीचा तुकडा स्वतः खातो. बाबांच्या ताटात जेवणाऱ्या चिमुकलीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

बाबा संध्याकाळी किंवा रात्री घरी आले की, त्यांच्याच कपातील चहात बिस्कीट बुडवून खाणे, त्यांच्या ताटात जेवणे आपल्यातील प्रत्येकाने नक्कीच केले असेल. तर, आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा (Video) तसेच बघायला मिळाले. टेबलावर बाबांचे ताट वाढलेले दिसते आहे. त्याच टेबलावर अगदी मांडी घालून बसलेली त्यांची चिमुकली त्यांच्याच ताटात जेवते आहे. बाबा एक घास लेकीला आणि एक घास स्वतःला अशा प्रकारे जेवताना दिसत आहेत. हे पाहून आईला भरून आले आणि तिने हा व्हिडीओ पोस्ट करण्याचे ठरवले. तसेच पोस्ट करीत ‘कसं सांगू? किती सुखं मिळतंय बघून’, अशी कॅप्शनदेखील व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सुख शब्दात सांगण्यासारखं नाही

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mahira_3647 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. काय ती मांडी घालणे, काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे… ठार प्रेमात पडलो, आम्हालाही सुख मिळालं तुमचा हा व्हिडीओ बघून, सुख आणखी काय असतं ग…, हे सुख शब्दांत सांगण्यासारखं नाही. हे अनुभवलं की, माणूस काही क्षणांसाठी सर्व दुःख विसरून जातो आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.