Viral Video Of Little Boy: मुलांनी एखादे काम चांगले केले किंवा वाईट, त्याचे संपूर्ण श्रेय हे पालकांना जाते. मुलांनी वाईट काम केले की तुझ्या आई-बाबांनी तुझ्यावर हेच संस्कार केलेत का? तुझ्या पालकांनी तुला काही शिकवलं नाही का? यावर समाजातील लोक चर्चा करू लागतात आणि चांगलं काम केलं की, शेवटी आई-बाबांची शिकवण, असे अगदी सहज म्हणून जातात. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न प्रत्येक पालक करत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. यामध्ये एका चिमुकल्याच्या कृतीने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Video) गेमिंग झोनचा आहे. मॉलमध्ये पालकांबरोबर जाणाऱ्या लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी तेथे किड्स झोन (Kids Zone) असतात. येथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात येतात. तरुण मंडळींपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जण येथे त्यांचे लहानपण पुन्हा जगतात. पण, येथे प्रवेश घेण्यासाठी एक कार्ड घ्यावे लागते आणि त्यात आपल्या सोयीनुसार रिचार्ज करावा लागतो, त्यामुळे प्रत्येकाला ते शक्य होईल असे नाही. तर आज हेच दृश्य व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा…VIDEO: एकदाचा मोबाईल मिळाला! हरवलेला फोन लागला हाती; या फीचरमुळे त्याने मालकाचा घेतला शोध, पाहा व्हिडीओचा जबरदस्त शेवट

व्हिडीओ नक्की बघा…

एक चिमुकला त्याच्या आईबरोबर किड्स झोनमध्ये खेळ खेळताना दिसतो आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येते की, बाजूला उभ्या राहिलेल्या एका अज्ञात चिमुकल्यालासुद्धा खेळावेसे वाटत असते, हे त्याला समजते. तेव्हा चिमुकला अज्ञात मुलाला हलक्या हाताने स्पर्श करून त्याला चेंडू देतो. अज्ञात मुलगा चेंडू हातात घेऊन खेळण्यास सुरुवात करतो. हे पाहिल्यानंतर एखाद्या मित्राप्रमाणे चिमुकला जोरजोरात टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतो आणि आनंद व्यक्त करतो, जे पाहून तुमचेही मन नक्कीच भरून येईल असे म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला खूप समाधान वाटले

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @trendruiners या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘शेवटी त्याने टाळ्या वाजवल्या हे पाहून मन भरून आले’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये चिमुकल्याच्या पालकांचे कौतुक तर चिमुकल्याला सॅल्यूट करताना दिसत आहेत. एका युजरने ‘त्याच्या लक्षात आलं, मग त्याने हलक्या स्पर्शाने त्याच्याकडे चेंडू दिला.. त्यानंतर तो खेळताना मित्र म्हणून आनंद लुटला. एका सज्जन माणसापेक्षा तो मनाने चांगला आहे, यामुळे मला खूप समाधान वाटले’; अशी कमेंट केली आहे.