Video Shows Techer And Students Bond : शाळा ही प्रत्येकासाठीच खास असते. आपण हळूहळू मोठे होत जातो आणि आपले शालेय शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर अनेक जण विविध क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या काॅलेजमध्ये प्रवेश घेतात याचदरम्यान आपला अनेक मित्र-मैत्रिणींशी असलेला संपर्क तुटतो आणि मग ते शाळेच्या आठवणींच्या कोशापुरतेच मर्यादित राहतात. तो मौलिक क्षण जपण्यासाठी अनेक जण शाळा किंवा कॉलेजच्या शेवटच्या दिवशी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या समूहाचा शिक्षकांसह एक विशेष फोटो काढून घेतला जातो आणि त्याची प्रत आठवण म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते..

पण, बदलत्या काळानुसार आता बहुतांशी बाबी डिजिटल होऊ लागल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर मंगळुरूच्या शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मंगळुरूच्या लॉर्डेस सेंट्रल विद्यालय -बजाई या शाळेत विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस असतो. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या या दिवशी शिक्षक त्या विद्यार्थ्यांना खास निरोप देताना दिसत आहेत. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांना एका रांगेत बसवण्यात आले आहे. मग फक्त वर्गातील दोन विद्यार्थिनी पुढे येतात आणि काय करतात ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ हृदयाला स्पर्श करून गेला…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, फक्त वर्गातील दोन विद्यार्थिनी पुढे येतात आणि ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणे बॅकग्राऊण्डला वाजण्यास सुरुवात होत आहे. ‘अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं’ या गाण्याच्या बोलावर विद्यार्थिनी हावभाव देत काही स्टेप्स करतात आणि मग मागे जातात. त्यानंतर रांगेत उभे असलेले विद्यार्थी एकेक करून बाजूला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनीच्या, शिक्षिकेच्या खांद्यावर डोके ठेवतात आणि एक सुंदर फोटो क्लिक केला जातो आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lourdes_central_school_bejai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘२०२४-२५ या बॅचचा शेवटचा दिवस’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पुन्हा शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओ हृदयाला स्पर्श करून गेला, जयश्री मॅडम ही रील करायला तयार झाल्या यावर विश्वास बसत नाही आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून येत आहे.