राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात सोमवारी विविध भागात जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह दुपारी जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकासान झाले आहे, तसेच पोल्ट्री शेड अन् जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान भरपवासात कलिंगड विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि त्याच्या मुलाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकला मुलगा पावसात कलिंगड भिजू नये यासाठी तो धडपडत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कशाची पर्वा न करता दिवस रात्र कष्ट करून अन्-धान्या, फळ भाजीपाला पिकवतात आणि बाजारात विकतात. व्यापारी शेतकऱ्यांकडून हा माल खरेदी करून विविध ठिकाणी जाऊन ग्राहकांना विकतात पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकासह अशा विक्रेत्यांचे मोठे नुकसान होते. अशाच एका फळ विक्रेत्याची दयनीय अवस्था दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक फळविक्रेता रस्त्यावर कलिंगड विकताना दिसत आहे. रस्त्यावरच कलिंगडाचा मोठा ढीग आहे तर दुसरीकडे टोपल्यांमध्ये आंबे ठेवलेले दिसत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली आहे. कलिंगड पावसामध्ये भिजू नये यासाठी ते विक्रेते प्रयत्न करत आहे. पण पाऊस इतका झाला आहे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. पावसाच्या पाणी मोठ्या वेगात वाहत आहे त्याबरोबर कलिंगडही वाहून जात आहे. एक चिमुकला पावसात वाहून जाणारे कलिंगड वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हि़डीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. व्हायरल व्हिडिओ करमाड (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील असल्याचे समोर आले आहे.
एवढ्या लहान वयात चिमुकल्याला परिस्थितीची जाणीव आहे हे पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले.