Boys Fight Over Girlfriend Video: फक्त एक चित्रपट बघायला गेले होते… पण, बाहेर येताना काय झालं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. थिएटरमधून बाहेर पडल्यावर एकाच मुलीवरून दोन तरुणांमध्ये भयंकर वाद झाला आणि पुढच्या काही क्षणांत ते अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले. सिनेमा पाहून प्रेम जागं झालं की रागाचा स्फोट? ‘सैयारा’च्या शोबाहेर घडलेला हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. तरुणाई हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहे. या चित्रपटाने रिलीजनंतर अवघ्या काही दिवसांतच मोठी कमाई केली आहे. पण, यातच मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून आता एक अजब प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
घटना आहे ग्वालियरमधील डीबी मॉलमधील सिनेमा हॉल परिसराची. येथे दोन युवक ‘सैयारा’ चित्रपट पाहायला आले होते. चित्रपट संपून दोघं बाहेर पडताच गर्लफ्रेंडवरून दोघांमध्ये भीषण मारामारी जुंपली.
प्रेमाचं रिंगण आणि लाथाघुश्शांची ‘सुपरफाइट’
चित्रपटाच्या प्रभावात आलेले दोघे युवक, आपल्या गर्लफ्रेंडबाबत इतके संवेदनशील झाले की, सिनेमा हॉलच्या बाहेरच एकमेकांवर तुफान लाथा-बुक्के चालवायला सुरुवात केली. कोणी कुणाला फरफटून ओढत होतं, तर कुणी दुसऱ्याला खाली पाडत होतं. काही वेळातच या दोघांची मारामारी पाहण्यासाठी आसपास गर्दी झाली.
एका स्थानिक व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आणि थेट सोशल मीडियावर अपलोड केला. काही क्षणातच हा VIDEO व्हायरल झाला आणि त्यावर प्रतिक्रियांचा पूर आला.
पोलिसांत तक्रार नाही, पण सोशल मीडियावर हाहाकार
गंमत म्हणजे, या संपूर्ण मारामारीची कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही. तरीही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, दोघं एकमेकांवर प्रचंड रागाने तुटून पडले होते. मध्ये पडणाऱ्यांनासुद्धा त्यांनी बाजूला सारलं. सोशल मीडियावर लोक या घटनेबाबत भन्नाट कमेंट्स करत आहेत. “सैयारा साइड इफेक्ट!”, “गर्लफ्रेंड कुठे आहे रे भाऊ?”, हद्द झाली गमतीची एका मुलीवरून असं वागतात का?” अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना केवळ एका चित्रपटाच्या प्रभावामुळे झाली की आधीच ताणतणाव होता, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, एक गोष्ट नक्की, प्रेमात पडल्यावर लोक काय करतील सांगता येत नाही आणि जर सैयारा पाहून असं होत असेल, तर पुढचा भाग आणखी धक्कादायक ठरू शकतो.