दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. गेल्या काही दिवसांपासून प्राण्यांच्या मारहाणीच्या, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये विशेषत: कुत्र्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ जास्त असतात. मात्र आता एक असा व्हिडीओ पाहायला मिळतो आहे, जो प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारा आहे. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात, त्यांनाही प्रेमाची जाणीव असते हेच या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. दरम्यान आपल्याला कुणी मदत केली तर त्याची जाणीव ठेवत आपण समोरच्या व्यक्तिला धन्यवाद देतो, मात्र प्राण्यांना कृतज्ञता व्यक्त करताना पाहिलंय का? नाही ना. मग हा व्हिडीओ पाहा.. सोशल मीडियावरही या व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये –

या व्हिडीओमध्ये काही कुत्र्याची पिल्ले दिसत आहेत. एक महिला या भुकेलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना काहीतरी खाऊ घालते आहे. यावेळी रस्त्यावरील एक कुत्रा त्या महिलेजवळ येतो आणि महिलेभोवती फिरत तिला गोंजारतो. कुत्र्याच्या हालचालीवरुन ती पिल्लांची आईच असल्याचं स्पष्ट होतंय. हा कुत्रा महिलेभोवती फिरत एक वेगळ्या प्रकारे मान हलवत आहे, जणू तो तिला धन्यवाद म्हणू पाहतोय. दरम्यान महिलाही अत्यंत प्रेमाने कुत्र्याच्या डोक्यावरुन हात फिरवत आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video viral : गोव्यात सुरक्षा रक्षकाला मारहाण करणं महिलेच्या आलं अंगलट, थेट मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप अन्…

हा व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले असून काहींनी त्या महिलेचे कौतुक केले आहे. तसेच एका युजरने यामध्ये आईची माया दिसत असून कुत्रा स्वत: न खाता आधी तिच्या पिल्लांनी खाल्ले आहे का ते पाहते आहे, अशी कमेंट केली आहे. शिवाय या महिलेनं या कुत्र्याला मदत केली, त्याला पोटभर खाऊ घातलं, त्याची भूक भागवली त्या महिलेचंही सर्वांनी कौतुक केलं आहे. @PierPets नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला 91 हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत.