Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हे परिस्थितीचे भान दर्शवणारे असतात तर त्या अगदी उलट काही व्हिडीओ श्रीमंती म्हणजे काय याचेच दर्शन घडवतात. काही श्रीमंत इन्फ्ल्यूएंसर मंडळी सोशल मीडियावर आपण नेहमी वापरत असलेल्या वस्तू दाखवून आजवर कितीवेळा ट्रोल झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना हे खर्च विनाकारण आणि मुख्य म्हणजे आपल्या ऐपतीच्या बाहेरचे वाटतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे ज्यामध्ये एका महिलेने विमानातील शॉवर सिस्टीमचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. हे व्हिडीओ म्हणजे पैसे कसे वाया घालवायचे याचं उदाहरण आहे असे अनेकजण म्हणत आहेत. नेमका काय आहे हा प्रकार चला पाहुयात..

ट्रॅव्हल कपल अशा एका अकाऊंटवरून अलीकडेच एमिरेट्स A ३८० या विमानातील एक लग्जरी सेवेचा व्हिडीओ शेअर केला होता. यात फर्स्ट क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बुकिंग करून विमानात शॉवर घेण्याची सुविधा अनुभवता येते. तुम्हाला प्रवास सुरु झाल्यावर विमानातील एका खास भागात नेलं जातं. इथे तुम्हाला गरम पाण्याचा शॉवर घेता येतो. तुम्हाला शॅम्पू- कंडिशनर, साबण, हेअर ड्रायर, तेल, जेल, सगळं काही इथे पुरवलेले असते. हा शाही थाट बघून आपणही थक्क व्हाल.

Video: विमानात आंघोळ? एवढी महाग…

हे ही वाचा<< स्मृती इराणींना ‘सास भी कभी बहू थी’ साठी मिळायचा ‘इतका’ पगार; स्वतः सांगितलं, “मी McDonald मध्ये काम..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भडकून कमेंट्स केल्या आहेत. याच पोस्ट वर या विमानाच्या एका माजी हवाई सुंदरीने सुद्धा कमेंट केली आहे. फक्त आंघोळीसाठी लाखो रुपये खर्च करण्याची काहीच गरज नाही उलट तुम्ही फक्त फर्स्ट क्लासचे तिकीट बुक करून आराम अनुभवू शकता. फार फार तर तुम्हाला प्रवासाच्या आधी आंघोळीचे कष्ट घ्यावे लागतील पण एवढे पैसे वाया घालवणे गरजेचे नाही.