अरुणाचल प्रदेशमधील बोमजा गाव आता देशातील सर्वात श्रीमंत गाव झालं आहे. या गावातील सर्व कुटुंब रातोरात कोट्यधीश झाले आहेत. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावकऱ्यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी मोदी सरकारचे आभारही मानले आहेत. भारतीय सैन्यांकडून या गावातील जमीन संपादित करण्यात आली आणि भूसंपदनाचा मोबदला म्हणून प्रत्येक कुटुंबाला कोट्यवधीची रक्कम देण्यात आली.

सामान्य मुलाशी लग्नासाठी पदत्याग करणाऱ्या राजकन्येनं लग्न ढकललं पुढे

बापरे… पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘वाईट दर्जाची आरोग्य सेवा पुरवू’

बोमजा गावात सध्या ३१ घरं आहेत. भारतीय सैन्य दलाकडून या गावातील जमीन संपादित करण्यात आली. भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून सरकारकडून ४१ कोटींची निधी या गावाला देण्यात आला. गावातील ३१ कुटुंबापैकी एका कुटुंबाला ६ कोटी अन्य एका कुटुंबाला अडीच आणि उर्वरित कुटुंबांना एक ते दोन कोटींचा मोबदला देण्यात आला. गुरुवारी धनादेशाद्वारे हा मोबदला प्रत्येक कुटुंबांना देण्यात आला. त्यामुळे यागावातील प्रत्येक गरिब कुटुंब हे रातोरात कोट्यधीश झाले आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला आहे. राज्य प्रगती करत आहे, राज्यात रस्ते, रेल्वेमार्ग उभे राहत आहेत. राज्य प्रगतीच्या वाटेवर आहे आणि हे सरकारच्या प्रयत्नामुळे शक्य झाले अशा शब्दात मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.