देशातील कानाकोपऱ्यात टॅलेंट आहे. हे टॅलेंट अनेक कारणामुळे सगळ्यांसमोर येऊ शकतं न्हवत. पण गेल्या काही वर्षात सोशल मिडियामुळे आपलं टॅलेंट सोप्या मार्गाने सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा मंच मिळाला आहे. सोशल मिडियाचा वापर करुन अनेकजण आपलं टॅलेंट कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. लॉकडाउनच्या काळात तर सोशल मिडियावरील अनेक टॅलेंटड कलाकारांमुळे आपलं मनोरंजन झालं आहे. सोशल मिडियावरती रोज काहीना काही ट्रेण्ड होतचं असत. अनेकजण सोशल मिडियावरील इंफ्ल्युएन्सर्सना बघून प्रेरणा घेतात आणि अनेक गोष्टी त्यांच्यासारख्याच करायलाही सुरुवात करतात. अशाच पद्धतीने इंस्टाग्रामवरच्या प्रसिद्ध मराठमोळ्या जोडप्याच्या नावावरून त्यांच्या फॅन दाम्पत्याने नुकतच जन्माला आलेल्या आपल्या बाळाचं नाव ठेवलं आहे.

कोण आहे हे प्रसिद्ध जोडपं?

प्रसाद आणि दीपिका वेदपाठक हे सोशल मिडियावरील प्रसिद्ध जोडप आहे. नेटीझन्स यांना ‘प्रसिका’ म्हणून ओळखतात. या दोघांच ‘युवर इंडिअन कन्झुमर’ नावच एक युट्युब चॅनेलही आहे. ‘युआयसी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जोडप्याने गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात लोकांच घर बसल्या मनोरंजन व्हावं म्हणून इंस्टाग्रामवर ‘प्रसिका’ नावच अकाऊंट सुरु केलं. या अकाऊंटवरून ते नवरा बायकोमधील नेहमी घडणाऱ्या घटनांवरती आधारीत विनोदी व्हिडिओ बनवून लोकांच मनोरंजन करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasika® (@prasika_official)

फॅन दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं ‘प्रसिका’

प्रसाद आणि दीपिका मिळून तयार झालेलं ‘प्रसिका’ हे नाव सध्या सगळ्यांच्याच तोंडावर आहे. या व्हायरल जोडप्याच्या प्रेमात असलेल्या फॅन दाम्पत्याने नुकतच जन्माला आलेल्या आपल्या बाळाचं नावं प्रसिका असं ठेवलंय. या फॅन दाम्पत्याने मुलीच्या बारशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये. प्रसाद आणि दीपिका यांना टॅग करत आपल्या मुलीचं नावं प्रसिका ठेवल्याचं त्यांनी रिवील केलंय. प्रशांत गावडे असं या चाहत्यांचं नावं आहे. हा व्हिडिओ प्रसाद आणि दीपिका या व्हायरल कपलने आपल्या इस्टाग्रामवर शेअर केलाय. सोबतच बाळाला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे या मराठमोळ्या व्हायरल होत असलेल्या जोडप्याची सोशल मिडियावरती चांगलीच चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही हिरो हिरोईनच्या नावावरून नाव ठेवण्यापेक्षा एखाद्या सोशल मिडिया इंफ्ल्युनसरच्या नावावरून स्वतःच्या मुलीचं नाव ठेवल्यामुळे इंटरनेटवर चांगलीच चर्चा सुरु आहे.