Viral Video: इंटरनेट हे एक असे माध्यम आहे, जिथे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. इंटरनेटवर आपण मानवता दर्शवणारे अनेक व्हिडीओ पाहतो, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणुसकीचे अनोखे उदाहरण या व्हिडीओमध्ये मांडण्यात आले आहे.

जीव धोक्यात घालून त्या माणसाने वाचवले पक्ष्याला

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून पक्ष्याचा जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्या व्यक्तीचे प्रचंड कौतुक करत आहेत. याशिवाय लोक याला मानवतेचे उदाहरणही म्हणत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पक्षी विजेच्या तारेवर जीवन आणि मृत्यू यांच्यात मध्ये अडकलेला दिसत आहे.

( हे ही वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ शहरात १० हजार रुपये लिटरने विकले जात आहे गाढवाचे दूध, खरेदी करणाऱ्यांची लागलीये लाइन )

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये एक पक्षी विजेच्या तारेवर अडकल्याचे दिसत आहे. तो सतत पंख फडफडवत असतो. कदाचित तो विजेच्या तारेमध्ये अडकला असेल. तितक्यात एक हेलिकॉप्टर तिथं येतं. त्या हेलिकॉप्टरच्या स्टँडवर एक व्यक्ती बसली आहे. तो आपला जीव धोक्यात घालून पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी विजेच्या तारेजवळ जाते. हा व्हिडीओ पाहून सगळेच त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.

( हे ही वाचा: मित्रांनी लग्नाच्या दिवशीच नवरदेवासोबत केलं असं काही की, व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही! )

( हे ही वाचा: Viral Video: कालव्याच्या काठावर उभं राहून ही तरुणी घेत होती सेल्फी, आणि मग… )

नेटीझन्सने केल्या हृदयस्पर्शी कमेंट्स

हा व्हायरल व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दयाळूपणा जगाला राहण्यासाठी एक उत्तम जागा बनवते.’ लोकांना या व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत आहे आणि प्रत्येकजण त्या व्यक्तीच्या माणुसकीचे कौतुक करत आहे. ट्विटरवर आतापर्यंत सुमारे ४४ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘महान काम.’