scorecardresearch

Viral News : तीन वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर ७८ वर्षीय व्यक्तीने केलं लग्न; वधूचं वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का

प्रेमामध्ये रंग, रूप, जात, वय, इत्यादी गोष्टींना महत्त्व नसतं, याची प्रचिती आपल्याला ही बातमी वाचताना नक्की येईल.

Viral News : तीन वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर ७८ वर्षीय व्यक्तीने केलं लग्न; वधूचं वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का
तीन वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर ७८ वर्षीय व्यक्तीने केलं लग्न; वधूचं वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का (Image: ViralPress)

प्रेमविवाहाच्या संबंधित अनेक बातम्या आपण रोज ऐकतो किंवा वाचतो. यातील बऱ्याचशा बातम्या गंभीर असतात, तर कधीकधी काही बातम्या अतिशय मजेशीर असतात. पण अशाही काही बातम्या असतात, ज्या ऐकल्यावर आपणच थक्क होतो. सध्या अशीच एक बातमी तुफान व्हायरल झाली आहे. या बातमीनुसार एका वृद्धाने वयाच्या ७८ वर्षी लग्न केले आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये नवल वाटण्यासारखं काय आहे? पण या व्यक्तीने ज्या मुलीशी लग्न केलं आहे, तिचं वय जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

प्रेमामध्ये रंग, रूप, जात, वय, इत्यादी गोष्टींना महत्त्व नसतं, याची प्रचिती आपल्याला ही बातमी वाचताना नक्की येईल. यानंतर प्रेम खरंच आंधळं असतं यावर आपला विश्वास बसेल. फिलिपिन्स येथे एका ७८ वर्षीय वृद्धाने नुकतंच लग्न केलं आहे. याआधी ही व्यक्ती जवळपास तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीनंतर दोघांनीही लग्न केले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने आपल्यापेक्षा ६० वर्षांनी लहान, म्हणजेच १८ वर्षाच्या मुलीशी लग्न केलं आहे. या ७८ वर्षीय वृद्धाचं नाव रशीद मांगकोप असून ते पेशाने शेतकरी आहेत.

Viral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”

‘मिरर’मधील रिपोर्टनुसार, तीन वर्षांपूर्वी कागायन येथील एका डिनर पार्टीमध्ये रशीद यांची ओळख १५ वर्षीय हलिमा अब्दुल्लाशी झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे लग्नाची परवानगी मागितली. कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीनंतर रशीद आणि हलिमा यांनी लग्न केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या