सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही भन्नाट कल्पना अचंबित करणाऱ्या असतात. अशीच एक कल्पना ट्विटरवर चर्चेचा विषय ठरत आहे. एका ट्विटर युजरने तो दर आठवड्याला एकाचवेळी २० बर्गर ऑर्डर करत असल्याचे सांगितले आहे, याचे कारणही त्याने ट्वीटमध्ये दिले आहे.
एरा (AraDG11) या ट्विटर युजरने एका आठवड्यासाठी एकाचवेळी २० बर्गर ऑर्डर करत असल्याचे सांगितले आहे. याचे कारण सांगताना तो म्हणाला यामुळे डिलीवरी चार्जेस वाचवता येतात. ही भन्नाट कल्पना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच वेळी ऑर्डर दिल्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगळ्या ऑर्डरवर द्यावे लागणारे डिलीवरी चार्ज वाचवता येते, असे त्याने ट्विटर कॅप्शनमध्ये लिहले आहे. एकाचवेळी ऑर्डर केलेले हे बर्गर तो आठवडाभर खात असे.पाहा व्हायरल होणारे ट्वीट.
व्हायरल ट्वीट :
या ट्वीटमधील भन्नाट कल्पना पाहून नेटकऱ्यांनी या ट्विटर युजरचे कौतुक केले आहे.