मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाइफ लाइन. लोकल सुरु असेल तर मुंबई ऑन ट्रॅक असते आणि लोकल बंद तर मुंबई थांबली इतकं घट्ट नातं या रेल्वे सेवेचं आर्थिक राजधानीसोबत आहे. अर्थात करोना कालावधीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकल ट्रेनची सेवा अनेक महिने बंद ठेवावी लागली होती. मात्र आता निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकरांची लाडकी लोकल ट्रॅकवर धावू लागलीय. मुंबईसहीत महाराष्ट्रभर सरकारने मास्क ऐच्छिक केलं असलं तरी मुंबई लोकलच्या गर्दीत अनेकजण मास्क घालून आजही दिसतात. मात्र सध्या मुंबई लोकल पुन्हा सुरु झाल्यानंतर लोकलमधील व्हिडीओ आणि फोटो पुन्हा एकदा या ना त्या कारणाने चर्चेत असल्याचं दिसू लागलंय. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये एकजण चक्क बनियान आणि टॉवेल गुंडाळून लोकलच्या दारात उभा असल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> मुंबई : लोकलच्या गर्दीत मागून धक्का दिल्याने चुकून घेतलं महिलेचं चुंबन; आरोपीचा दावा फेटाळत कोर्टाने सुनावला तुरुंगवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या फोटो हा मध्य रेल्वेच्या डब्ब्याचा आहे. या फोटोमध्ये लोकल ट्रेन एका स्थानकावरुन ब्रिज खालून जात असताना एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या दारामध्ये बनियान आणि टॉवेल गुंडाळून उभा असल्याचं दिसत आहे. दरवाजाच्या मध्यभागी असणाऱ्या खांबाला पकडून ही व्यक्ती फूटबोर्डवर उभी असल्याचं दिसत आहे. डब्ब्यावर सेंट्रल रेल्वे असं लिहिलेलं आहे. हा फोटो नेमका कोणत्या स्थानकावर काढण्यात आलाय, ही व्यक्ती कोण आहे? हा फोटो कधीचा आहे हे प्रश्न अद्याप निरुत्तरित आहेत.

तरी हा फोटो सोशल मीडियावरही चर्चेत आहे. एकाने हा फोटो शेअर करत एसी लोकलला या अशा माणसांमुळे मुंबईत फारसा प्रतिसाद मिळत नाही अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.

अन्य एकाने याच फोटोवर कमेंट करत, “गरमी मे भी थंडी का एहसास..” असं म्हटलंय.

मुंबई लोकलमधील सामानाच्या रॅकवर झोपलेल्या व्यक्तीचा फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral photo man traveling in mumbai local on baniyan and towel scsg
First published on: 20-04-2022 at 15:23 IST