Viral Photo Shows Mumbai auto rickshaw : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रिक्षा, ट्रक, कार, बिल्डिंगच्या प्रत्येक फ्लोअरवर शोभा वाढवण्यासाठी किंवा इतरांना आकर्षित करण्यासाठी काही मेसेज लिहिलेले असतात. अनेकदा सकारात्मक विचार, शायरी तर कुटुंबातील सदस्यांची नावेसुद्धा लिहिलेली असतात. तर आज अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका मुंबईच्या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर कोणती शायरी किंवा संदेश न लिहिता काही खास प्रवाशांना एक सुंदर वचन दिले आहे. कोण आहेत ते प्रवासी? काय लिहिलं आहे या रिक्षावर, (Viral Photo) चला जाणून घेऊ…

व्हायरल फोटो (Viral Photo) मुंबईतील मालाड परिसरातील आहे. एक अज्ञात प्रवासी या परिसरातून प्रवास करत असतो. त्यादरम्यान या प्रवाशाला एक अनोखी रिक्षा जाताना दिसते. ही रिक्षा खास रंगाची किंवा वेगवेगळ्या वस्तूंनी डिझाईन केलेली नसते, तर या रिक्षावर प्रवाशांसाठी खास संदेश लिहिलेला दिसतो. तर अज्ञात प्रवासी हे बघतो आणि त्याच्या मोबाइलमध्ये फोटो काढून घेतो. फोटो काढून झाल्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर करतो. नक्की रिक्षावर काय लिहिलं आहे, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘बाबा, खूप खूप आभार…’ सरप्राईज पाहून चिमुकला रडला; VIRAL VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

पोस्ट नक्की बघा…

Saw this on backside of auto in malad
byu/maverickmru inmumbai

दिव्यांगजनांसाठी मोफत प्रवासाची घोषणा :

व्हायरल पोस्टमध्ये (Viral Photo) तुम्ही पाहिलं असेल की, रिक्षाच्या मागे दिव्यांग प्रवाशांसाठी खास मेसेज लिहिला आहे. ‘१.५ किलोमीटरपर्यंत प्रवास फ्री’ असं लिहून दिव्यांगजनांसाठी मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Reddit ॲपवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती दाखवल्याबद्दल रिक्षाचालकाचे कौतुक व थँक यू म्हणताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, देव अशा माणसांना आशीर्वाद देवो’; आदी अनेक कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षाचालकांच्या अशा विविध गोष्टी व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी स्मार्ट वॉचने पेमेंट करणाऱ्या रिक्षाचालकाचा फोटो व्हायरल (Photo Viral) झाला होता. त्यानंतर रिक्षा चालवताना ऑफिस चेअर बसवून घेणाऱ्या रिक्षाचालकाचीही बरीच चर्चा रंगली होती. तसेच अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये रिक्षा सजवून घेणाऱ्या रिक्षाचालकांमुळे अनेकांचे लक्ष वेधले जाते. पण, आज माणुसकी दाखवणाऱ्या रिक्षाचालकाचे दर्शन घडले आहे; ज्याने दिव्यांग व्यक्तींसाठी खास प्रवासाची सोय केली आहे.