आता जगभरात महिला समाज आणि संस्कृती नव्याने बदलण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज त्या प्रत्येक ठिकाणी गरुड झेप घेत आहेत. रिक्षा चालवण्यापासून ते विमान उड्डाणापर्यंत महिला आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नाव मोठं करताना दिसत आहेत. अशा तरुणींना किंवा स्त्रियांना पाहिलं की, त्या प्रत्येक महिलांनादेखील तितकाच अभिमान वाटतो. तर आज सोशल मीडियावरसुद्धा अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेक शहरांत महिलांना रिक्षा चालवताना पाहिलं असेल. ही गोष्ट जरी नवीन नसली तरीही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या या क्षेत्रात कमीच आहे. तर बंगळुरूमध्ये राहणाऱ्या तरुणीचा रिक्षा प्रवास एका कारणाने खास ठरला आहे. तरुणीने एक्स (ट्विटर) वर एक फोटो शेअर केला आहे. तसेच तरुणीने जी रिक्षा प्रवासासाठी बुक केली, त्याची ड्रायव्हर एक महिला होती हे पाहून तिला खूप अभिमान वाटला. तसेच तिने रिक्षात बसल्यावर महिलेचा एक पाठमोरा फोटो शेअर केला. रिक्षाचालक महिलेबद्दल तरुणीने पोस्टमध्ये काय लिहिलं एकदा तुम्हीसुद्धा बघा..

हेही वाचा… अवघ्या काही सेकंदांत व्यक्तीने वाजवली १११ वाद्ये! VIDEO पाहून कराल कौतुक

पोस्ट नक्की बघा :

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तरुणीने एका महिलेने चालवलेल्या ऑटो रिक्षामधून प्रवास करण्याचा तिचा प्रथमच अनुभव शेअर केला. तिने महिला ऑटो ड्रायव्हरचा फोटो शेअर करत लिहिले की, बंगळुरूमध्ये प्रवास करताना पहिल्यांदाच माझी ऑटो ड्रायव्हर एक महिला आहे आणि यामुळे मला काही कारणास्तव खूप आनंद झाला; असे खास कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट या एक्स (ट्विटर) @prakritea17 अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून काही बंगळुरूचे रहिवासी या महिलेबरोबर प्रवास केल्याचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत. रिक्षाचालक महिला चेन्नईची रहिवासी आहे. महिला अगदी आरामदायक आणि सुरक्षितरित्या ग्राहकांना त्यांच्या घरी पोहचवते; असे कमेंटमध्ये अनेक युजर सांगताना दिसत आहेत. सोशल मीडियावर युजरने ही पोस्ट शेअर करत महिलांचे सर्व क्षेत्रातील योगदान पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.