एका म्युझिक व्हिडीओच्या शूटिंग दरम्यान गायिकेला साप चावल्याचा धक्कादायक क्षण गायिका माईताने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला.२१ वर्षीय गायिका व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा लेस बॉडीसूट घालून दिसत आहे. तिच्या छातीवर काळा साप फिरत असलेला दिसत आहे.
काही सेकंदांनंतर, कोणीतरी तिच्या वर पांढरा साप ठेवताना दिसतो. पण त्याच क्षणी तिच्या चेहऱ्याजवळून फिरणाऱ्या काळ्या सापाने तिच्या हनुवटीवर चावा घेतला.गायकाने त्वरेने सापाला पकडले आणि त्याला दूर नेले. तिच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिले: “जेव्हा मी तुम्हा सर्वांसाठी व्हिडीओ बनवण्यासाठी प्रयत्न करते.”
(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)
(हे ही वाचा: Video: मानवी वस्तीत शिरलेल्या दोन सिंहानी बैलाला घेरले, मग काय झाले ते तुम्ही बघाच…)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ४.४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चार दिवसांपूर्वी इन्स्टावर शेअर केलेल्या तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये ती गाताना दिसली होती. तिने एका पोस्टमध्ये तिने तिच्या फॉलोअर्सने सांगितले की ती सापाच्या हल्ल्यातून वाचली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “कृपया या एका अनुभवामुळे तुम्हाला या सुंदर प्राण्यांबद्दल नकारात्मक मानसिकता येऊ देऊ नका.”