लहान मुलांना कंटाळा आला की आपण त्यांना एखादे कोडे घालतो. मग ते कोडे घेऊन आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांचा बराच वेळ जातो. याशिवाय कधी विरंगुळा म्हणून किंवा मज्जा म्हणूनही आपण व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियावर वेगवेगळे पझल्स सोडविण्यात कधी दंग होऊन जातो आपले आपल्यालाच कळत नाही. मात्र नुकतेच व्हायरल झालेलं एक कोडं तुम्हाला सुटता सुटणार नाही हे नक्की.
या कोड्यामध्ये एका घरातील साप शोधायचा आहे. आता तुम्हाला वाटेल घरातील साप शोधणे ही काय इतकी अवघड गोष्ट आहे. तर हो एका अतिशय पसारा असलेल्या जुन्या पद्धतीच्या आणि काहीशी पडझड झालेल्या घराच्या कोपऱ्यातील साप शोधणे आपल्याला वाटते तितके सोपे नक्कीच नाही. हा घरात दडलेला साप शोधण्यासाठी तुमची बरीच शक्ती खर्ची पडूनही तुम्हाला उत्तर सापडणार नाही आणि मग वैतागून तुम्ही हे कोडे सोडविणे बाजूलाच ठेऊन द्याल याची खात्री आहे. ऑस्ट्रेलियातल्या एका घरातील हा फोटो असून सोशल मीडियावर हे कोडं व्हायरल होत आहे. आता तुम्हालाही बराच वेळ प्रयत्न करून याचं उत्तर सापडत नाहीय तर फार टेन्शन घेऊन नका आम्ही मदतीला आहोतच.