Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेबरोबर असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
अनेकांना प्राणी खूप प्रिय असतात. पण, तेच प्राणी त्यांच्याबरोबर कधी काय करतील हे सांगता येत नाही. माणसांनी कितीही जीव लावला तरी बऱ्यचदा प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक माकड महिलेला लाडीगोडी लावताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माकडप्रेमी महिला जंगालात कॅमेरा घेऊन गेली असताना त्यावेळी तिथे तिला एक माकडाचे पिल्लू दिसते. ती त्या पिल्लाजवळ जाताच यावेळी ते पिल्लू महिलेला पाहून तिच्या जवळ जाऊन तिला लाडीगोडी लावते आणि त्यानंतर तिच्या गालाचे चुंबन घेते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत अकरा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर सात लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘प्राणी खूप प्रेमळ असतात.’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘अरे बापरे, खूप छान’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूप खूप प्रेम दोघांना’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘ताई सांभाळून, काही माकडं खूप भयानक असतात.’