Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. सोशल मीडियावरील रील्स, डान्स, गाणी अशा विविध गोष्टींनी आपले मनोरंजन होते. मात्र, अनेकदा यावर काही धक्कादायक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा अपघात, मारहाण अशा दुर्घटनांचाही समावेश असतो. या घटना कधी माणसांसोबत; तर कधी प्राण्यांसोबतही होतात. अशा व्हिडीओंवर लोक खूप संताप व्यक्त करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये कुत्र्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले होते. अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे; ज्यात एका कुत्र्याबरोबर एक लहान मुलगा असे काही तरी करतो, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नदीच्या पुलावरील कट्ट्यावर एक श्वान उभा असून यावेळी एक लहान मुलगा त्या श्वानाला हाताने खाली ढकलतो. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तो लहान मुलगा आणि त्याचे काही मित्र पाण्यात पडलेल्या श्वानाला पाहण्यासाठी जातात. मुक्या प्राण्याला अशा प्रकारे त्रास देऊन ते सर्व जण मोठमोठ्याने हसतात आणि मजा घेतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @smile_please_1956 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ काढणाऱ्याला अगोदर हाणला पाहिजे”. आणखी एकाने लिहिलेय, “यालापण उचलून फेकायला पाहिजे”. तर आणखी एकाने लिहिलेय, “काय संस्कार आहेत मुलांवर”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “अतिशय नालायक मुलगा आहे.”