Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड विविध गोष्टींमुळे सातत्याने बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात तिनं असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
लहान मुलं खूप निरागस असतात. पण, ती कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही. आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळेच अनेकदा आई-वडिलांच्या नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
अनेकदा लहान मुलं घराबाहेर जाऊ नयेत म्हणून घराच्या उंबरठ्याजवळ किंवा जिन्याजवळ गेट किंवा फळी लावली जाते. लहान मुलं पालकांच्या नकळत घराबाहेर पडू नयेत किंवा घरातील जिन्यावर त्यांनी जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. आता असाच एक प्रकार या व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्येही एक फळी जिन्यावर लावण्यात आली आहे; परंतु घरातील लोकांच्या नकळत एक लहान चिमुकली जिन्याच्या बाजूच्या सळ्यांमधून जिन्यावर जाते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathiparva या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आणि या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “अरे बापरे, खूपच करामती मुलगी आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “माझी मुलंही अशीच आहेत.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “मुलांवर खूप लक्ष ठेवायला लागतं.”