Viral Video: जंगलातील व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, ज्यात कधी एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दिसतो, तर कधी कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होऊन लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक जंगली कुत्रा, हरणाची शिकार करताना दिसतोय.
जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटविण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक जंगली कुत्रा हरणाची शिकार करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये एक जंगली कुत्रा हरणावर हल्ला करताना दिसतोय. जंगली कुत्रा हरणाची सरळ मान आपल्या जबड्यात पकडून, त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मरणाच्या दारात पोहोचलेले हरीण जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @safaribushretreat या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या आणि त्यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “किती भयानक आहे हे”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “किती वाईट मृत्यू आहे याचा”, तर तिसऱ्यानं लिहिलंय, “बिचारा…”.