Viral Video: देश एकीकडे प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करीत यशाच्या पायऱ्या चढून जात आहे, तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, बलात्कार, शोषण, मारहाण अशा समस्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर दिवशी देशाच्या विविध भागांतून अशा घटनांचे व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात, ज्यावर संताप व्यक्त करण्याशिवाय कोणी काहीही करत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. रस्त्यावरून चालताना अनेकदा महिलांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
सोशल मीडियावर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओ आपला थरकाप उडवणारे असतात. या व्हिडीओंमध्ये कधी अपघाताच्या घटना, तर कधी भांडण, मारहाण, अश्लील कृत्य पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यावर नेटकरीही तीव्र संताप व्यक्त करतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी लायब्ररीमध्ये जात असून यावेळी एक तरुण तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे जातो. यावेळी आपला कोणीतरी पाठलाग करत आहे याची कल्पना तरुणीला नव्हती. परंतु, लायब्ररीचा दरवाजा उघडून आत जाताच तरुण तिच्या मागे जाऊन तिला मिठी मारतो. तरुणाने पकडल्यावर तरुणी त्याला दूर ढकलते आणि लायब्ररीच्या रिसेप्शनवर बसलेल्या व्यक्तीला हा प्रकार सांगते. यावेळी तरुण तिथून पळून न जाता पुढे येतो आणि रिसेप्शनवर बसलेल्या व्यक्तीबरोबर बोलतो. पुढे काय घडलं हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले नाही.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “काय प्रकार आहे हा, देशात महिला सुरूक्षित नाहीत”, दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खरंच मुली घराबाहेर सुरक्षित नसतात”, तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “माथेफिरू आहे वाटत… नाहीतर एकतर्फी प्रेम.”