Viral Video AC Explosion In Faridabad : “माझं पूर्ण घर जळालं…मला मदत करा” असा आक्रोश करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले असून, तो नेमका कशाचा आहे याची चर्चा सुरू आहे. हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
फरीदाबाद (हरियाणा) येथील ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. एका घरातील एसी ब्लास्ट झाल्यामुळे मोठी आग लागली. ग्रीन फील्ड कॉलनीत रविवारी रात्री अचानक मोठा स्फोटाचा आवाज आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा आवाज एसी ब्लास्टचा होता. त्यानंतर घरातून धूर व आग बाहेर येऊ लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप घेतले. स्थानिक नागरिकांनी व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट धुराने व आगीने वेढला गेला होता.
या दुर्घटनेमध्ये त्या कुटुंबातील तिघांचा तसेच पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. घटनेतील आणखी एक सदस्य खिडकीतून उडी मारून बाहेर पडला असला तरी तो गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. या भीषण घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले असून पाहणाऱ्यांना धक्का बसत आहे.
पाहा व्हिडीओ…
तसेच दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील तिघांचा या आगीत गुदमरून मृत्यू झाला. घरचे प्रमुख सचिन कपूर, त्यांची पत्नी रिंकू कपूर आणि मुलगी सुजन कपूर यांचा यात समावेश आहे. त्यांचा पाळीव कुत्राही या आगीतून वाचू शकला नाही. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली असून शेजाऱ्यांनी या दुर्दैवी प्रसंगामुळे धक्का बसल्याचे सांगितले.
आगीच्या वेळी कुटुंबातील आर्यन कपूर नावाचा सदस्य खिडकीतून उडी मारून बाहेर आला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. चौकशीत आग लागण्याचे कारण एसी स्फोट किंवा शॉर्टसर्किट असल्याचे समोर आले आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.