मेक्सिकोमध्ये, पक्ष्यांचा एक थवा रहस्यमयपणे आकाशातून अचानकपणे पडला, त्यापैकी बरेच पक्षी खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. ७ फेब्रुवारीचा हा विचित्र घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो पिवळ्या डोक्याचे काळे पक्षी दिसून येत आहेत. स्थानिक न्यूज आउटलेट एल हेराल्डो डी चिहुआहुआच्या मते, मेक्सिकोमधील चिहुआहुआ येथील रहिवाशांनी फुटपाथवर मृत पक्षी आढळल्यावर पोलिसांना कळवले. अल्वारो ओब्रेगॉनच्या विभागीय पोलिसांनी सांगितले की त्यांना सोमवारी सकाळी ८.२० च्या सुमारास मृत पक्ष्यांचे फोन येऊ लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरक्षा कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये मोठ्या काळ्या भोवर्यात पक्ष्यांचा थवा घरावर पडताना दिसला. तर काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये पक्षी रस्त्यावर निर्जीव पडलेले दिसत आहेत.

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

हे फुटेज ट्विटरवर १.५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहे. पक्षी रहस्यमयपणे आकाशातून का पडले हे स्थानिक अधिकारी त्वरित स्पष्ट करू शकले नाहीत – परंतु व्हायरल व्हिडीओने अनेक सिद्धांतांना जन्म दिला आहे.

(हे ही वाचा: विराट कोहलीचा श्रीवल्ली स्टाईल डान्स बघितला? शानदार कॅच घेतल्यानंतरचा Video Viral)

यूएसए टुडेच्या मते, एका पशुवैद्यकाने असे सिद्ध केले की पक्षी एकतर विषारी धूर त्यांच्या शरीरात गेला असेल किंवा हीटरमधून किंवा विजेच्या तारांवर बसताना त्यांना विजेचा धक्का बसला असेल. सोशल मीडियावर काही लोकांनी असाही अंदाज लावला की हे रहस्यमय मृत्यूचे कारण ५G असू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video and in an instant a flock of birds fell from the sky ttg
First published on: 18-02-2022 at 11:01 IST