स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, हे आईचे महात्म्य सांगणारे वाक्य आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. सोशल मीडियाद्वारेही आईच्या त्यागाबद्दल आणि तिच्या कष्टांबद्दल अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. आपल्या आयुष्यातील आईचे स्थान इतर कोणालाच देता येणार नाही. आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवले तरी आईची ओढ तितकीच असते. तिच्या कष्टांची जाणीव ही प्रत्येकाला असतेच, याचाच प्रत्येय येणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ मेजर जनरल रंजन महाजन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निवृत्त होण्याआधी त्यांनी त्यांच्या आईला सरप्राईज दिल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार मेजर जनरल रंजन महाजन अंबालाहून दिल्लीला आईला सरप्राईज देण्यासाठी गेले. ‘निवृत्त होण्याआधी शेवटचा सलाम आईला, जिने मला इतकं सक्षम बनवलं ज्यामुळे मला ३५ वर्ष भारतमातेची सेवा करण्याची संधी मिळाली,’ असे त्यांनी लिहिले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने रचला सापळा; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…
मेजर जनरल रंजन महाजन यांचे आईवरील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धतीने नेतकऱ्यांची मनं जिंकली असुन, हा व्हिडीओ भावुक करणारा आहे अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.