Viral Video: सोशल मीडियावर डान्स, गाणी, अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांचे रील्स व्हायरल होत असतात. त्यातील अनेक जण त्यांच्यातील कलेमुळे खूप चर्चेत येतात आणि प्रसिद्ध होतात. प्रसिद्धी मिळाली की, त्यांच्या कलेला खऱ्या अर्थाने वाव मिळतो. अगदी लहान चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा यात समावेश असतो. सध्या यावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही उत्साही महिला आपली कला व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर मांडतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरामध्ये ‘पियवा दुलारे’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडीओ काही सेकंदाचा असून या व्हिडीओतील महिलेचा डान्स युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या डान्सवर सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काकी, तुम्ही कमाल आहात”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “काकू लाजत नाहीत बिंदास नाचतात”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “काकू, वय झालं जरा हळू नाचा”. आणखी एकाने लिहिलेय, “एकच नंबर”.