Viral Video: काही कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही कलाकार महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून, गाणं म्हणून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

मागील अनेक महिन्यांपासून संगीता मिश्रा नावाची ही महिला सोशल मीडियावर अगदी धूमाकुळ घालत आहे. भोजपुरी गाण्यावर हटके डान्स, त्यातील एकापेक्षा एक जबरदस्त स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावांनी तिने अनेकांना भुरळ घातली आहे. आता पुन्हा तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला एका गार्डनमध्ये ‘पिया जी की मुस्की’ या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या महिलेचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत पंधरा मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर चार लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “काकू तुम्ही आताच्या काळात जन्म घ्यायला हवा होता” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “जबरदस्त डान्स”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “किती सुंदर डान्स करतायत काकू”