Viral Video Today: एखाद्या प्राणी संग्रहालयात गेल्यावर प्राण्यांना पाहताच अनेकांच्या उत्साहाला नियंत्रणच राहत नाही. अर्थात बिल्डिंगच्या जंगलात राहत असताना प्राण्यांच्या नावावर फक्त कुत्रा, मांजरी, चिमण्या-कळवली पाहिलेल्यांना वाघ, अस्वलाचं कौतुक वाटणारच. पण हे कौतुक जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाटू लागतं तेव्हाच ही पर्यटक मंडळी काही चुका करून बसतात. अशाच एका अतिउत्साही महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. प्राणी संग्रहालायत पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहिणीला पाहून ही महिला इतकी भारावून गेली की थेट तिच्यासह सेल्फी काढण्यासाठी धावली. खरंतर आश्चर्य म्हणजे यावेळी सिंहिणीनेही महिलेवर हल्ला केलाच नाही पण उलट बाजूच्या पिंजऱ्यातून जो हल्ला झाला तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, जेव्हा ही पर्यटक तरुणी सिंहिणीसह फोटो काढायला जाते तेव्हा बाजूच्या पिंजऱ्यातील एक अस्वल अचानक तिला बघून पुढे येतं, पिंजऱ्यातून अस्वल हात बाहेर काढून त्या तरुणीचा टीशर्ट खेचू लागतो. अर्थात यामुळे तरुणीची चांगलीच घाबरगुंडी उडते.

Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

अन अचानक तरुणीचा टीशर्ट खेचू लागलं अस्वल

@hasret_kokulum या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज व हजारो लाईक्स आहेत. अनेकांनी कमेंट करून या तरुणीच्या अतिउत्साहावर टीका केली आहे. काय गरज होती? असा प्रश्न करून अनेकांनी या तरुणीची शाळा घेतली आहे.

Video: लग्नाचा उत्साह 101! खाली डोकं वर पाय करून नाचू लागला नवरा, नवरीने तर अशा अदा दाखवल्या की..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही अनेकदा अशा अतिउत्साही पर्यटकांना पिंजऱ्यातील प्राण्यांनी चांगला धडा शिकवला होता. तर काही वेळा सोशल मीडियावर संग्रहालयातील प्राणी माणसांशी प्रेमाने वागतानाही दिसून आले आहेत. आता हा मूड बघून ओळखणे गरजेचे आहे नाहीतर या तरुणीसारखी परिस्थिती होऊ शकते.