Viral Video: लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात नवरदेवाची वहिनी डान्स करताना दिसतेय.

या व्हिडीओतील वहिनीच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी तिच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. वहिनीच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेने आपल्या डान्स स्टेप्समधून संपूर्ण कार्यक्रमातील पाहूण्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या दीराच्या लग्नामध्ये “लो चली मैं अपने देवर की बारात लेके”, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स अन् चेहऱ्यालवरील हावभाव पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @RuhiVinuVlog-gc1sd या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि तीन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “खूप सुंदर डान्स केला ताई”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “असा असतो सुंदर”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान केला डान्स”