Python Video viral: सोशल मीडियावर साप, नाग किंवा अजगर पकडण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात; पण अशा प्रकारचे प्राणी पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षण गरजेचं असतं. अन्यथा हे धाडस जिवावर बेतू शकतं. याकडे दुर्लक्ष करून काही जण साप, नाग, किंग कोब्रा, अजगर पकडण्याचं धाडस करतात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्ही देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती न घाबरता चक्क विशाल अजगराला पकडण्याचं धाडस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

साप, नागांपासून दूर राहणं चांगलं असं कायम सांगितलं जातं; मात्र अलीकडच्या काळात धाडस आणि फॅशनसाठी साप, नाग पाळून त्यांचं संगोपन केलं जातं. हे धाडस जीवघेणं ठरू शकतं. सध्या या संदर्भातला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने जंगलात विशाल अजगर पाहिला, त्यानंतर या व्यक्तीने अजगराचे तोंड आपल्या हाताने पकडले. पण अजगर पूर्ण ताकदीने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा तरुणही ताकदीने अजगराला पकडण्याचा प्रयत्न करतोय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – कहर! चक्क बुलेटवर नवरा-नवरीचं ‘प्री वेडींग फोटोशूट’ Video झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलाढ्य अजगर कोणालाही जिवंत गिळू शकतं. पण असं असलं तरी देखील एका व्यक्तीने विशाल अजगराचा पकडण्याचं धाडस केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल असून या व्हिडीओला आतापर्यंत लाख व्ह्यूज गेले आहेत. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट देखील केल्या आहेत.